अखेर सुरु झाली! पनवेल-रत्नागिरीदरम्यान कोकण रेल्वेची विशेष मेमू सेवा

By कमलाकर कांबळे | Published: February 4, 2024 08:41 PM2024-02-04T20:41:44+5:302024-02-04T20:42:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : प्रवाशांची गैरसोय दूूर करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेने पनवेल ते चिपळूण आणि रत्नागिरीदरम्यान अनारक्षित ...

Finally started! Special MEMU service of Konkan Railway between Panvel-Ratnagiri | अखेर सुरु झाली! पनवेल-रत्नागिरीदरम्यान कोकण रेल्वेची विशेष मेमू सेवा

अखेर सुरु झाली! पनवेल-रत्नागिरीदरम्यान कोकण रेल्वेची विशेष मेमू सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : प्रवाशांची गैरसोय दूूर करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेने पनवेल ते चिपळूण आणि रत्नागिरीदरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाड्या चालविण्यचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१ मार्चपर्यंत प्रत्येक रविवारी दोन्ही बाजूने दोन मेमू गाड्या धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय टळेल, असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे.

पनवेल- रत्नागिरी (०११५७) ही विशेष अनारक्षित मेमू गाडी ४ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत प्रत्येक रविवारी रात्री ८:२५ वाजता पनवेल स्थानकातून सुटेल. तर ती दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता रत्नागिरी स्थानकावर पोहचेल. तसेच चिपळूण- पनवेल ( ०११५८) ही विशेष अनारक्षित मेमू गाडी ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च यादरम्यान प्रत्येक रविवारी दुपारी १५:२५ वाजता चिपळूण स्थानकातून सुटेल. ती त्याच दिवशी रात्री ८:१५ वाजता पनवेल स्थानकात पोहचेल.

ही मेमू विशेष गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रूक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमाटणे या स्थानकांवर थांबेल, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Web Title: Finally started! Special MEMU service of Konkan Railway between Panvel-Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.