बँकेची फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: March 23, 2017 01:47 IST2017-03-23T01:47:42+5:302017-03-23T01:47:42+5:30

खांदा वसाहतीतील बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून लोन घेऊन त्यांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

Filing a complaint against two cheating bank | बँकेची फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

बँकेची फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

पनवेल : खांदा वसाहतीतील बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून लोन घेऊन त्यांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. बँक आॅफ इंडियातून आठ लाख रु पयांचे कार लोन घेऊन, या गाडीचे आरसी बुक व इन्शुरन्स पावती बँकेत जमा केली नाही. त्यामुळे बँकेने सुधीर पवार व अन्य एका विरोधात ८ लाख ९१ हजार ६८७ रुपयांची फसवणूक के ल्याची तक्रार दाखल के ली आहे.
सुधीर पवार (पनवेल) व ऐरोली येथे राहणारी अन्य एक व्यक्ती या दोघांनी २०१३मध्ये खांदा वसाहतीतील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत जाऊन इनोव्हा गाडी घेण्यासाठी कार लोनची मागणी केली. त्यानुसार बँकेने त्यांना आठ लाख रु पयांचे कर्ज मंजूर केले व त्याचा चेक त्यांना देण्यात आला. त्यानुसार बँकेने दोघांना आरसी बुक व इन्शुरन्स बँकेत जमा करण्यास सांगितले.
तसेच कर्जाचे हप्तेही भरले नाहीत. बँकेने वारंवार नोटिसा देऊन कर्जाचे हप्ते भरण्यास सांगितले. मात्र, त्यांनी तेही भरले नाहीत. अखेर बँकेने खांदेश्वर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन घाडगे करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Filing a complaint against two cheating bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.