शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक प्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

By admin | Updated: January 28, 2017 03:10 IST

सीलिंकलगत बंगलो प्लॉट देण्याकरिता पैसे घेवून फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नवी मुंबई : सीलिंकलगत बंगलो प्लॉट देण्याकरिता पैसे घेवून फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरवर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या बिल्डरविरोधात यापूर्वी देखील राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचा आर्थिक विभाग याप्रकरणी अधिक तपास करत आहे.प्रवीण गोरे यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे केली होती. त्यानुसार लँडस्केप ड्रीम्स बिगीन कंपनीच्या पंडित धावजी राठोड या बिल्डरविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई ते द्रोणागिरीदरम्यान होणाऱ्या सीलिंक परिसरातील जागेवरील बंगलो प्लॉट या कंपनीने विक्रीसाठी काढले होते. मागील काही महिन्यांपासून इच्छुक ग्राहकांना या बंगलो प्लॉटची विक्री सुरू करण्यात आली होती. त्यानुसार प्रवीण गोरे यांनी देखील सदर कंपनीकडे २ लाख २ हजार रुपये भरले होते. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटून देखील त्यांना प्लॉटचा ताबा दिलेला नव्हता. त्यामुळे गोरे यांनी फसवणूकीची तक्रार गुन्हे शाखा पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, राठोडविरोधात यापूर्वी देखील सांगली, रायगड व पुणे याठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार राठोडविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्याकडून इतरही अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता असून, संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन गुन्हे शाखेतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)