खारघर शहरालगतच्या डोंगरावर भीषण आग; मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपदेचा ऱ्हास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 22:20 IST2021-02-05T22:19:56+5:302021-02-05T22:20:04+5:30
दरवर्षी अशाप्रकारे खारघर हिलवर आग लागते.मागील वर्षी देखील हा प्रकार वारंवार घडत असल्याने वनविभागाने याठिकाणी फिरते पथक नेमले होते

खारघर शहरालगतच्या डोंगरावर भीषण आग; मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपदेचा ऱ्हास
पनवेल :खारघर शहरालगतच्या डोंगरावर शुक्रवारी सायंकाळी उशिरा भीषण वणवा लागला होता. हा वणवा नेमका लागला की लावला गेला याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
दरवर्षी अशाप्रकारे खारघर हिलवर आग लागते. मागील वर्षी देखील हा प्रकार वारंवार घडत असल्याने वनविभागाने याठिकाणी फिरते पथक नेमले होते. मात्र या घटना थांबल्या नाहीत.शुक्रवारच्या घटनेने देखील आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट नजरेस पडत होते.खारघर हिलवर देशी विदेशी पक्षाचा देखील वावर असतो.अशा घटनांमुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपदेचा ह्रास होत आहे.