शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कामोठेवासीयांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: July 3, 2017 06:46 IST

कामोठे वसाहतीतील नागरिकांना मुंबईकडे जाण्यासाठी दररोज जीव मुठीत घेऊन बेकायदा मार्गाने प्रवास करावा लागतो. साडेतीन महिन्यांपासून

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : कामोठे वसाहतीतील नागरिकांना मुंबईकडे जाण्यासाठी दररोज जीव मुठीत घेऊन बेकायदा मार्गाने प्रवास करावा लागतो. साडेतीन महिन्यांपासून हा जीवघेणा प्रकार सुरू आहे. या ठिकाणच्या अपघातांमध्ये सुमारे २० जणांनी प्राण गमवावे लागले आहेत, तर शेकडो जखमी झाले आहेत. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. कामोठेवासीयांच्या रोजच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने पनवेल-शीव महामार्ग सोमवारी रोखण्याचा इशारा दिला आहे. आंदोलन टळावे यासाठी नवी मुंबई पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेकापच्या नेत्यांशी शनिवारी भेट घेऊन चर्चा केली; परंतु कामोठे येथील शेकापचे कार्यकर्ते मोर्चावर ठाम आहेत. कामोठेवासीयांना वसाहतीमधून पनवेल-सायन महामार्ग गाठण्यासाठी दररोज दोन किलोमीटरचा वळसा घेऊन महामार्ग गाठावा लागतो. अवघ्या पन्नास मीटर रस्त्याचे काम बांधकाम विभागाने न केल्यामुळे हा घोळ झाला आहे. कामोठेवासीयांच्या या रोजच्या समस्येसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने ३ जुलै रोजी रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन शेकापच्या शिष्टमंडळासोबत शनिवारी सकाळी कामोठे पोलीस ठाण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम सध्या मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी थांबले असून, ही मंजुरी आल्यानंतर सर्वेक्षणाचे काम सुरू होईल, त्यानंतर निविदा पक्रिया पार पडण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागेल, त्यानंतर पुढील काम सुरू होईल, असे आश्वासन बांधकाम विभागाचे उपअभियंता अलगुट यांनी दिले. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत कामोठेतील सर्व्हिस रोडचे रखडलेले काम मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.५० मीटरचे काम अपूर्णसाडेबाराशे कोटी रूपयांचा मार्ग बांधा वापरा व हस्तांतरण करा या तत्त्वांवर बांधला. मात्र, यामधील अवघ्या पन्नास मीटरच्या मार्गाचे काम पूर्ण न केल्यामुळे कामोठेवासीयांना कळंबोलीतील उड्डाणपुलाखालून वळसा घेऊन मुंबईचा महामार्ग गाठावा लागतो.