शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

कृषी महोत्सवाचा शेतकऱ्यांना लाभ होणार - रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 03:35 IST

कृषी महोत्सव सामान्य शेतक-यांसाठी व्यासपीठ आहे. कृषी शेती आणि मत्स्य शेतीत आर्थिक सुबत्तेची ताकद आहे, त्यामुळे रोजगारासाठी युवकांनी शहराकडे न वळता तंत्रज्ञानाची जोड घेऊन शेतीचा विकास करून आदर्श शेतकरी बनण्याचा दृष्टिकोन ठेवावा

पनवेल : कृषी महोत्सव सामान्य शेतकºयांसाठी व्यासपीठ आहे. कृषी शेती आणि मत्स्य शेतीत आर्थिक सुबत्तेची ताकद आहे, त्यामुळे रोजगारासाठी युवकांनी शहराकडे न वळता तंत्रज्ञानाची जोड घेऊन शेतीचा विकास करून आदर्श शेतकरी बनण्याचा दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्र वारी कामोठेत आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी आपले मत मांडले.कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या वतीने खांदेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय रायगड जिल्हा कृषी महोत्सव २0१८ -१९ चे उद्घाटन राज्यमंत्री व रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज झाले. रवींद्र चव्हाण यांनी प्रत्येक स्टॉल्सला भेट देऊन त्यांची विचारपूस केली तसेच त्यांच्याकडून उत्पादनाविषयी माहिती घेतली त्याचबरोबर त्यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना, कृषी विभाग शेतकºयांच्या विकासासाठी सतत प्रयत्न करीत असून हा महोत्सव सामान्य शेतकºयांना व्यासपीठ मिळवून देणारा उपक्र म आहे, अशा शब्दात या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. खाडी व समुद्राच्या उधाणामुळे पीक धोक्यात असते, त्यामुळे त्यासाठी सक्षम पर्याय देणे ही काळाची गरज आहे, त्या अनुषंगाने कडधान्य पीक घेतले जात आहे.शेतीसोबत मत्स्य शेतीला प्राधान्य देणे ही गरज लक्षात घेता मागेल त्याला शेततळे देण्यात येत आहे. तरु णवर्ग स्थलांतरित होऊ नये, यासाठी शेतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो; पण त्याची साठवणूक होत नाही हे लक्षात घेऊन साडेचार हजारपेक्षा जास्त वनबंधारे बांधण्याचे काम करण्यात आले, अशी माहिती देतानाच धरण, तलाव आदी जलाशयातून लोकसहभातून साडेतीन लाखांपेक्षा मेट्रिक गाळ काढण्यात यश आल्याचे त्यांनी नमूद केले. विकासापासून दूर असलेल्या हिरवे गावात सरपंच पोपटराव यांनी शेतीला प्राधान्य देऊन गावाची प्रगती करून आदर्श दिला. तो आदर्श घेऊन शेतकºयांनी काम करावे, असा मौलिक सल्लाही दिला. त्याचबरोबर शेतकºयांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही चव्हाण यांनी या वेळी दिली.प्रास्ताविक कोकण विभाग कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी केले. या महोत्सवात उत्कृष्ट शेतकरी व शेतकरी गटांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.प्रदर्शनास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, नगरसेविका हेमलता गोवारी, संतोषी तुपे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई