शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बाजार समितीशी शेतकऱ्यांचा थेट संपर्क कमीच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 12:49 AM

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थेट शेतक-यांचा संपर्क कमी झाला आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थेट शेतक-यांचा संपर्क कमी झाला आहे. भाजी, फळ व कांदा मार्केटमध्ये २० टक्केच शेतकरी स्वत: माल पाठवत आहेत. उर्वरित माल मध्यस्थी व्यापाºयांकडूनच येत आहे. धान्य व मसाला मार्केटमध्ये शेतकरी स्वत: माल पाठवतच नाहीत. प्रशासनाने ठोस उपाययोजनाच केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असून, येथील शेतकरी निवासही ओस पडले असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीमध्ये निदर्शनास आले आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने नोव्हेंबर २००३ मध्ये फळ मार्र्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह इमारतीमध्ये शेतकरी निवास तयार केले; परंतु याचा वापरच झाला नाही. बाजार समितीमध्ये थेट शेतकºयांचा संपर्क कमी झाल्यामुळे व शेतकºयांसाठीच्या या सुविधेची माहितीच नसल्यामुळे निवासस्थान धूळखात पडले होते. बाजार समिती शेतकºयांच्या हितासाठी उपाययोजना राबवत असल्याचे प्रशासनाला दाखवून द्यायचे असल्यामुळे, जानेवारी २०१८ मध्ये शेतकरी निवासाचे नूतनीकरण केले. फक्त १०० रुपये भरून एक दिवस थांबण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे; परंतु शेतकरीच मार्केटमध्ये येत नसल्याने प्रत्यक्षात याचा वापर फारसा होत नाही. वर्षाला सात हजार कोटी रुपयांची उलाढाल येथील पाच बाजारपेठांमध्ये होत असते. देशातून व विदेशातूनही माल येथे विक्रीसाठी येत असतो. थेट शेतकरी आल्यास त्यांच्यासाठी काय सुविधा आहे याविषयी माहिती घेण्यासाठी प्रयत्न केला असता, बाजार समितीची यासाठी ठोस यंत्रणाच नसल्याचे निदर्शनास आले.येथील प्रत्येक मार्केटमध्ये सातारा जिल्ह्यातील एक शेतकरी जाऊन आम्हाला थेट मालाची विक्री करायची आहे, काय करता येईल, याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक मजेदार गोष्टी निदर्शनास आल्या. मार्केटमध्ये शेतकºयांसाठी माहिती केंद्रच उपलब्ध नाही. सर्व व्यापाºयांची यादी व त्यांची वार्षिक उलाढाल, संपर्क नंबर तत्काळ उपलब्ध होतील याची काहीच यंत्रणा नाही. आवक गेटवरील कर्मचाºयांनी त्यांच्या पद्धतीने माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. काहींनी कोणत्या व्यापाºयाकडे जायचे याविषयी माहिती दिली; परंतु ही माहिती देताना अशाप्रकारे कोणी शेतकरी थेट मार्केटमध्ये येत नाही. व्यापाºयांशी ज्यांचे जुने संबंध आहेत तेच येथे येत असल्याचेही सांगण्यात आले. शेतकºयांना थेट माल विक्री करण्यासाठीही फारशी सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. व्यापाºयांशी चर्चा केली असता कांदा, बटाटा व फळ मार्केटमध्ये फक्त २० टक्के शेतकरी स्वत: त्यांचा माल विक्रीसाठी पाठवत असल्याचे निदर्शनास आले. उर्वरित माल तेथील व्यापाºयांकडूनच विक्रीसाठी येत आहे. मसाला व धान्य मार्केटमध्ये शेतकरी जवळपास फिरकतच नसल्याचे निदर्शनास आले.>निवासामध्ये राहण्यासाठी सात-बारा घेऊन फिरायचे का?शेतकरी निवासामध्ये राहण्यासाठी सात-बारा उतारा, पॅन कार्ड व आधार कार्ड सक्तीचे आहे. व्यापाºयाचे व बाजार समितीचे पत्रही देणे आवश्यक आहे; परंतु शेतकरी सात-बारा उतारा घेऊन फिरणार का? बाजार समितीने फोटोसाठी एखादा पुरावा व आॅनलाइन सात-बारा चेक करून निवासस्थान उपलब्ध करून द्यावे व शेतकरी निवासाच्या सुविधेचे फलक प्रत्येक आवक व जावक गेटवर लावण्याची आवश्यकता आहे.>तुम्हाला पैसे मिळणार नाहीतफळ मार्केटच्या आवक गेटवर शेतकरी चौकशीसाठी गेले. सातारावरून स्ट्रॉबेरी आणली असल्याचे सांगितले. कर्मचाºयांनी तुम्ही येथे माल विकूच नका. येथील व्यापारी बदमाश आहेत. तुम्हाला पैसे मिळण्याची खात्री नाही, अशाप्रकारे माहिती देण्यात आली. मार्केट व एपीएमसीविषयी कर्मचाºयांनाच आस्था नसल्याचे पाहून शेतकरी आश्चर्यचकीत झाले. फळ मार्केटमधील उपसचिव राजाराम दौंडकर यांची भेट घेतली असता, त्यांनी मात्र शेतकºयांची आस्थेने चौकशी करून आवश्यक ती सर्व मदत करून काही अडचण आली तर थेट मला भेटा, असे सांगून दिलासा दिला.>तीन मार्केटमध्ये दिली विक्रीची माहितीकांदा - बटाटा, मसाला व धान्य मार्केटमध्ये विविध प्रकारचा माल विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्यानंतर कोणत्या व्यापाºयाकडे जावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. थेट विक्री करताना काय अडथळे येतात, या विषयीही माहिती देण्यात आली; परंतु बहुतांश जण मुंबईत थेट शेतकरी येत नसल्याचेच सांगत होते.