पालिकेवर फेरीवाल्यांचा मोर्चा

By Admin | Updated: January 24, 2017 06:01 IST2017-01-24T06:01:13+5:302017-01-24T06:01:13+5:30

महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन संलग्न नॅशनल हॉकर्स फेडरेशन व महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या वतीने महापालिकेच्या

Falwick Front | पालिकेवर फेरीवाल्यांचा मोर्चा

पालिकेवर फेरीवाल्यांचा मोर्चा

पनवेल : महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन संलग्न नॅशनल हॉकर्स फेडरेशन व महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या वतीने महापालिकेच्या कारवाई विरोधात मंगळवार, 24 जानेवारी रोजी सकाळी 11 मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली.
पनवेल महापालिकेने पथविक्र ेता कायदा २०१४ च्या आदेशाची अंमल बजावणी करावी, अशी माहिती पत्रकार परिषदेत विनिता बाळेकुंद्री, एस.के.नाईक यांनी दिली. महापलिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून हजारो फेरीवाले, पथ विक्रेते व्यवसाय करीत आहेत, महापालिकेच्या कारवाईमुळे त्यांच्या उपजीविकेवर गदा आली आहे. शहरातील सर्व रस्त्यांवरील फेरीवाल्यांना उठविण्यात आल्याने त्यांच्याकडे उपासमारीची वेळ आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मोर्चात दोन ते तीन हजार फेरीवाले उपस्थित राहणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.

Web Title: Falwick Front