शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 2:24 AM

घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची घटना खारघर येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची घटना खारघर येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेरुळ येथे राहणा-या खाजामोईनुद्दीन मुथलीफ (६१) यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. त्यांना चौदा लाखांत घर मिळवून देतो असे एका परिचयाच्या व्यक्तीने सांगितले होते. यानुसार मुथलीफ यांनी सदर व्यक्तीला धनादेशाद्वारे १२ लाख रुपये दिले होते, परंतु रक्कम घेवूनही त्यांना घर मिळत नव्हते. यामुळे त्यांनी सदर व्यक्तीकडे घरासाठी पाठपुरावा केला असता, त्याने सुरवातीचे काही दिवस त्यांना आश्वासन देवून बोळवण केली. मात्र पैसे देवून बराच कालावधी उलटत चालला होता.यामुळे मुथलीफ यांनी घर मिळावे यासाठी संबंधिताकडे तगादा सुरु ठेवला होता. यावेळी त्यांनी ज्याच्यासोबत व्यवहार करत आहोत त्याच्याविषयीची आवश्यक माहिती देखील मिळवलेली नव्हती. अखेर त्यांनी घराऐवजी घरासाठी दिलेली रक्कम परत मिळावी यासाठी त्याच्याकडे पाठपुरावा केला, परंतु टाळाटाळ केली.अखेर दिलेली रक्कम परत मिळवण्यासाठी संबंधिताकडे पाठपुरावा केला असता त्याने पोबारा केला आहे. यामुळे झालेल्या फसवणुकीची तक्रार खारघर पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार खारघर पोलिसांत सदर व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Homeघर