बनावट कंपनी चालकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:32 IST2019-11-13T00:32:30+5:302019-11-13T00:32:33+5:30
बनावट कंपनी स्थापन करून त्यामध्ये १४ कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक करून घेतल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

बनावट कंपनी चालकांना अटक
नवी मुंबई : बनावट कंपनी स्थापन करून त्यामध्ये १४ कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक करून घेतल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. वाशीत या कंपनीचे कार्यालय थाटून ग्राहकांना जादा नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीला भाग पाडले जात होते.
कॅपिटल क्लब ट्रेडर्स नावाने वाशीत ही कंपनी चालवली जात होती. नागरिकांना जादा नफ्याचे आमिष व इतर बक्षिसांची भुरळ घालून कंपनीच्या विविध बँक खात्यामध्ये ४,८४१ गुंतवणूकदारांनी १४ कोटी ५३ लाख रुपये जमा केल्याचेही आढळून आले होते. त्यानुसार गणेश राजेंद्र शिंदे, अभिजीत जाधव, समाधान चिंचोळे, संजय गवारे व बबन सदार यांना अटक करण्यात आली आहे.