शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातदारांचे आर्थिक नुकसान : जेएनपीएत केळी, द्राक्षे, कांद्याचे अद्यापही २,००० कंटेनर अडकलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 04:54 IST

मधुकर ठाकूर लोकमत न्यूज नेटवर्क उरण : मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शिपिंग कंपन्यांनी आयात निर्यात करण्यात येणाऱ्या प्रत्येक कंटेनरवर ...

मधुकर ठाकूरलोकमत न्यूज नेटवर्कउरण : मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शिपिंग कंपन्यांनी आयात निर्यात करण्यात येणाऱ्या प्रत्येक कंटेनरवर २ मार्चपासून अतिरिक्त २,००० ते ४,००० अमेरिकन डॉलर्स इतका आपत्कालीन संघर्ष अधिभार (ECS) लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या अधिभारामुळे आयात-निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. तर, या परिस्थितीमुळे जेएनपीए बंदरात केळीचे १,००० आणि कांदा, द्राक्षांचे १,००० असे २,००० कंटेनर अडकल्याची माहिती जेएनपीएने अधिकृतपणे दिली.

मध्यपूर्व आशियातील देशांमध्ये भडकलेल्या युद्धामुळे होर्मुझची खाडी मालवाहू जहाजांना कधीही बंद अथवा खुली केली जात आहे. या खाडीत जहाजांवरही हल्ले होण्याची भीती आहे. त्यामुळे शिपिंग कंपन्यांनी युद्धजन्य देशांमध्ये व त्यामधून आयात निर्यात होणाऱ्या कार्गो कंटेनर डिस्चार्ज किंवा लोड केलेले नाहीत. त्यातच युद्धजन्य प्रभावित क्षेत्रांमध्ये ऑपरेशन्स सुरक्षित करण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून शिपिंग कंपन्यांनी बहरीन, कुवेत, जिबूती, ओमान, इजिप्त (ऐन सोखना बंदर), कतार, एरिट्रिया, सुदान, इराक, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, येमेन, सौदी अरेबिया येथे पाठविण्यात येणाऱ्या कंटेनरवर आपत्कालीन संघर्ष अधिभार आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

कार्गो कंटेनर बंदरात ठेवून घेण्यासाठी सहकार्य युद्धाच्या परिस्थितीमुळे जेएनपीए बंदरात शनिवारपासून दोन हजार कंटेनर अडकले आहेत. सध्यातरी जेएनपीए बंदरात आयात निर्यात फारसा परिणाम जाणवत नसला, तरी येत्या काही दिवसांत तो जाणवेल. याबाबत जेएनपीए अध्यक्ष गौतम दयाल यांच्याशीही चर्चा झाली आहे. शिपिंग कंपन्यांनी मागणी केल्यास युद्ध परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या आयात-निर्यात होणारे कार्गो कंटेनर बंदरात ठेऊन घेण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका अध्यक्षांनी अधिकृत घेतली आहे, अशी माहिती जेएनपीए कंटेनर वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी गिरीश थॉमस यांनी दिली.

कोणत्या कंटेनरवर किती अधिभारसीएमए सीजीएम या शिपिंग कंपनीने जाहीर केलेल्या आपत्कालीन संघर्ष अधिभारानुसार २० फूट ड्राय कंटेनरसाठी २००० यूएस डॉलर्स (१,८३,८४० रुपये), ४० फूट ड्राय कंटेनरसाठी ३,००० यूएस डॉलर्स (२,७५,७६० रुपये) आणि रेफर किंवा विशेष उपकरणांच्या कंटेनरसाठी ४,००० यूएस डॉलर्स (३,६७,६८० रुपये) आकारण्यात येणार आहे.

केळी, द्राक्ष खराब होण्याच्या मार्गावरजेएनपीए बंदरात शनिवारपासून केळ्याचे १,००० कंटेनर अडकले आहेत. येत्या  १०-१५ दिवसांत केळ्यांचे कार्गो कंटेनर निर्यात झाले नाहीत, तर माल खराब होण्याची भीती केळी निर्यातदार व जी फाइव्ह मार्ट वन प्रा. लि. कंपनीचे मालक शब्बीर केपी यांनी व्यक्त केली. तसेच, बंदरात कांदा व द्राक्षांचे एकूण १,००० कंटेनर अडकले असल्याची माहिती निर्यातदार व्यापारी राहुल पवार यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Exporters Suffer Losses: 2,000 Containers of Produce Stuck at JNPA

Web Summary : Middle East conflict surcharge impacts exporters. 2,000 JNPA containers, including bananas, grapes, and onions, are stuck. Shipping companies levy extra fees due to regional instability, causing significant financial strain. JNPA offers support for stranded cargo.
टॅग्स :Iranइराणwarयुद्ध