पनवेलमध्ये गँस गळतीमुळे स्फोट, एक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 09:54 IST2018-05-31T09:54:58+5:302018-05-31T09:54:58+5:30
कळंबोली वसाहतीत पहाटे 6.45 च्या सुमारास झालेल्या स्फोटात पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत.

पनवेलमध्ये गँस गळतीमुळे स्फोट, एक ठार
पनवेल - कळंबोली वसाहतीत पहाटे 6.45 च्या सुमारास झालेल्या स्फोटात पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळंबोलीतील सेक्टर 3 मधील एल आय जी.रुम नंबर.एफ - 30 मधे हा स्फोट झाला. सिलेंडरमधून गँसची गळती झाल्याने हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. सोहम कट्टे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो पाच वर्षाचा होता. तर स्फोटात बबन कट्टे(40), शुभांगी कट्टे(32),अश्विनी जाधव आणि नानासो जाधव हे चौघे जखमी झाले आहेत.