व्हॅलेंटाइन डेनिमित्त खरेदीला उधाण; सोशल मीडियावरही धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 03:47 IST2018-02-14T03:46:37+5:302018-02-14T03:47:02+5:30

ज्या दिवसाची युवक-युवती वर्षभर वाट पाहत असतात, त्या व्हॅलेंटाइन डेसाठी सोमवारपासूनच शहरातील गिफ्ट हाउसमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीसाठी गिफ्ट खरेदी करण्यास युवावर्गाने गर्दी केली होती. व्हॅलेंटाइन निमित्त आज शहरात प्रेमाला बहर येणार आहे.

Expanding Valentine's Day shopping; Smoke on social media | व्हॅलेंटाइन डेनिमित्त खरेदीला उधाण; सोशल मीडियावरही धूम

व्हॅलेंटाइन डेनिमित्त खरेदीला उधाण; सोशल मीडियावरही धूम

नवी मुंबई : ज्या दिवसाची युवक-युवती वर्षभर वाट पाहत असतात, त्या व्हॅलेंटाइन डेसाठी सोमवारपासूनच शहरातील गिफ्ट हाउसमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीसाठी गिफ्ट खरेदी करण्यास युवावर्गाने गर्दी केली होती. व्हॅलेंटाइन निमित्त आज शहरात प्रेमाला बहर येणार आहे.
व्हॅलेंटाइन डेसाठी गिफ्ट हाउसमध्ये हार्ट, रोज, टेडीचे गिफ्ट विक्रीसाठी आले आहेत. व्हॅलेंटाइन डे सप्ताह सुरू झाल्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी युवकांनी गिफ्टची खरेदी केली असली, तरी खरेदीकरिता बाजारापेठा फुलल्या असून, खरेदीसाठी तरुणांबरोबरच ज्येष्ठांनीही गर्दी केली आहे.

लव्हस्टोरी बुकला पसंती
प्रत्येक व्हॅलेंटाइन डेसाठी खास गिफ्ट बाजारात येत असते. यंदा लव्हस्टोरी बुक आले आहेत. यामध्ये कपल पहिली भेट, बर्थडे, मतभेद, रु सवा, फुगवा, सुख-दु:ख आणि पुन्हा एकत्र येणे, हा सगळा प्रवास फोटोंसह लिहू शकता. या लव्हस्टोरी बुकला सध्या मोठी मागणी असून, दोनशे ते हजार रु पयांपर्यंत हे बुक वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

सोशल नेटवर्किंगवर धूम
व्हॅलेंटाइन डेसाठी सोशल नेटवर्किंग साइट्सवरही युवा एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. त्यासाठी अनेक कवितांचा वापर या शुभेच्छांमध्ये दिसून येत आहे. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर दिवसभर व्हॅलेंटाइन डेचे मेसेज सेंड केले जात आहेत.
अनेकांनी आउटिंगचे प्लॅन आखले आहेत.

Web Title: Expanding Valentine's Day shopping; Smoke on social media