शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 386 संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार; जिल्हा वार्षिक योजनेतून ३ टक्के निधी खर्च करता येणार

By नारायण जाधव | Updated: August 2, 2023 14:52 IST

राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या स्मारकांच्या संवर्धनासाठी जिल्हा विकास वार्षिक योजनेत एकूण बजेटपैकी ३ टक्के इतक्या निधीची तरतूद करून त्यातून या ३८६ स्मारकांचे संवर्धन करण्यास मंजुरी दिली आहे. 

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाने नवी मुंबईतील ऐतिहासिक बेलापूर किल्ल्यासह संरक्षित केलेल्या राज्यातील ३८६ स्मारकांचे संवर्धन आता जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करणे सोपे होणार आहे. राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या स्मारकांच्या संवर्धनासाठी जिल्हा विकास वार्षिक योजनेत एकूण बजेटपैकी ३ टक्के इतक्या निधीची तरतूद करून त्यातून या ३८६ स्मारकांचे संवर्धन करण्यास मंजुरी दिली आहे. चालू आर्थिक वर्षापासून ती करायची असल्याने या स्मारकांची दुरवस्था दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. जागतिक वारसा असलेली अजिंठा-वेरुळ लेणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उभे राहिलेले रायगड व सिंधुदुर्ग यांसारखे किल्ले, यादव व मराठाकाळात उभी राहिलेली व सुंदर शिल्पाकृतींनी नटलेली श्री मार्कंडेय व त्र्यंबकेश्वर यांसारखी मंदिरे, मध्ययुगीन मकबरे तसेच वसाहतकालीन स्थापत्यांचा समावेश आहे. यापैकी केंद्र सरकारद्वारा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने २८८ स्मारके राष्ट्रीय महत्त्वाची म्हणून जतन केली आहेत.महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य व पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने राज्यातील ३८६ स्मारके संरक्षित म्हणून घोषित केली आहेत. यामध्ये घटोत्कच व धाराशीवणी, राजगड, सिंहगड, माणिकगड यांच्यासारखे किल्ले तसेच जेजुरी, नीरा नृसिंहपूर, श्री तुळजाभवानी यांसारखी मंदिरे, लोकमान्य टिळक, सावरकर यांची जन्मस्थळे, गेट वे ऑफ इंडिया यांचा  समावेश  आहे.

बेलापूर किल्ल्यासह संरक्षित केलेल्या राज्यातील ३८६ स्मारकांचे संवर्धन आता जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करणे सोपे होणार आहे.

कामे करताना यांना द्यावे प्राधान्यस्मारकांचा कालखंड, स्मारकाची सद्य:स्थिती, भेट देणाऱ्या पर्यटकांची/भाविकांची संख्या, स्थानिक नागरिक/लोकप्रतिनिधी/संशोधकांची मागणी

ही कामे करता येणारपरीरक्षणासह जतन व संवर्धन, देखभाल दुरुस्ती, पर्यटक/भाविकांसाठी सोयीसुविधा (स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी इ.), सुशोभीकरण, रासायनिक जतन कामे, माहितीफलक, दिशादर्शक बसविणे.

‘पुरातत्त्व’ची परवानगी लागणार कामे करण्यासाठी सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग यांची परवानगी लागणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी याबाबतच्या प्रस्तावांना नियोजन समितीकडून मान्यता घ्यायची आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर मंजूर निधी जिल्हाधिकारी संबंधित सहायक संचालक पुरातत्त्व विभाग यांच्याकडे पाठवून त्यांच्याकडून प्रस्तावित कामे करून घ्यायची आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई