Exclusive Video: रसायनी वायुगळतीत बळी गेलेल्या पशु-पक्ष्यांची अधिकाऱ्यांकडून विल्हेवाट, प्रत्यक्षदर्शीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 12:25 PM2018-12-15T12:25:38+5:302018-12-15T13:06:33+5:30

रसायनीतल्या पाताळगंगामध्ये असलेल्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनीतून झालेल्या वायुगळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Exclusive: officers disposal of animal birds who died during the rasayani gas leakage | Exclusive Video: रसायनी वायुगळतीत बळी गेलेल्या पशु-पक्ष्यांची अधिकाऱ्यांकडून विल्हेवाट, प्रत्यक्षदर्शीची माहिती

Exclusive Video: रसायनी वायुगळतीत बळी गेलेल्या पशु-पक्ष्यांची अधिकाऱ्यांकडून विल्हेवाट, प्रत्यक्षदर्शीची माहिती

Next

अजय परचुरे/भालचंद्र जुमलेदार
पनवेल- रसायनीतल्या पाताळगंगामध्ये असलेल्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनीतून झालेल्या वायुगळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वायुगळतीमुळे 28 वानरांसह 48 माकडं मृत्युमुखी पडली. त्याचा कोणालाही थांगपत्ता न लागू देता अधिकाऱ्यांना विल्हेवाट लावली आहे.

अधिकारी विल्हेवाट लावत असताना एका प्रत्यक्षदर्शीनं पाहिलं आहे. त्या प्रत्यक्षदर्शीनं लोकमतला पशु-पक्ष्यांची कशा पद्धतीनं विल्हेवाट लावली याची माहिती दिली आहे. पशु-पक्ष्यांना पुरण्यासाठी जेसीबीनं खड्डा खणण्यात आला, त्यावेळी मारुती खुराडे ही व्यक्तीही तिथे उपस्थित होती. एकाच खड्ड्यात मोठमोठ्या वानरांसह माकड आणि कबुतरांना गाडण्यात आलं. ते दृश्य पाहून मला रात्रीच जेवणही गेलं नाही. तेव्हा फोटो काढावा असं वाटलं होतं. परंतु माझ्याकडे कॅमेरावाला फोन नव्हता. त्यामुळे फोटो काढता आला नाही, असंही प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं आहे.

28 वानरांसह 48 मृत्युमुखी पडलेल्या माकडांचा एचओसी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणालाही थांगपत्ता न लागू देता विल्हेवाट लावली आहे. या घटनेनं प्राणी मित्रांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच रसायनीच्या जवळपास कर्नाळा अभयारण्य असल्यानं या वायुगळतीमुळे वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.  रसायनी इथल्या पाताळगंगा परिसरात असलेल्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनीतून मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली. बुधवारी रात्री 9.45 वाजताच्या सुमारास ही घडना घडली असून, या वायुगळतीमुळे 28 वानरांसह 48 माकडं मृत्युमुखी पडली आहेत. तर 100हून अधिक पक्षी गतप्राण झाले आहेत.

हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल(एचओसी) कंपनी ही इस्रोसाठी इंधन निर्मितीचं काम करते. 13 डिसेंबरला म्हणजेच बुधवारी रात्री 9.45 वाजताच्या सुमारास या कंपनीच्या इंधनाच्या टाकीतून ही वायुगळती सुरू झाली. या वायुगळतीचा आजूबाजूच्या परिसरातील असंख्य पशू-पक्ष्यांना फटका बसला.

Web Title: Exclusive: officers disposal of animal birds who died during the rasayani gas leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल