देशाच्या प्रगतीत सर्वांचेच समान योगदान पाहिजे
By Admin | Updated: March 17, 2016 02:35 IST2016-03-17T02:35:26+5:302016-03-17T02:35:26+5:30
नवी मुंबईतील इवोल्व बिझनेस स्कूलच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात वूमन्स अचिव्हर्स अॅवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते.

देशाच्या प्रगतीत सर्वांचेच समान योगदान पाहिजे
नवी मुंबई : नवी मुंबईतील इवोल्व बिझनेस स्कूलच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात वूमन्स अचिव्हर्स अॅवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माच्या प्रमुख पाहुण्या देशातील पहिल्या महिला निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना देश आणि समाजाचा विकास साधण्यासाठी महिला आणि पुरुषांचे समान योगदान असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.
यावेळी समाजात आज पुरु ष आणि महिलांच्या संख्येमध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याची बेदी यांनी खंत व्यक्त केली. त्यामुळे घरातील प्रत्येक मूल, महिला तसेच पुरु षांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे, असेही बेदी यांनी स्पष्ट केले. समाजाला पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम घरातील स्त्रिया करत असल्याने त्यांना सन्मानाने वागविले पाहिजे. विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या महिलांचा ज्याप्रमाणे सन्मान केला जातो, त्याचप्रमाणे महिला दिनाच्या आदल्या दिवशी समाज सुधारण्यासाठी चांगले कार्य करणाऱ्या पुरु षांना देखील सन्मानित करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन एक प्रेरणादायक उपक्रम राबविण्याचे किरण बेदी यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात कायम दुष्काळाची समस्या गंभीर असून सरकारने एरिगेशनमध्ये लावलेल्या पैशांचा योग्य तऱ्हेने वापर झाला असता, तसेच त्यात भ्रष्टाचार झाला नसता आणि महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती राहिली नसती, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. यावेळी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया मोरे, संगीता शिंदे-अल्फान्सो, मीरा बनसोडे, समाजसेविका वृषाली मगदूम, ईटीसी केंद्राच्या प्रमुख वर्षा भगत, समाजसेविका हेमलता गायकवाड, रेडिओ जॉकी अर्चना या व अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५० कर्तृत्ववान महिलांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.