शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण पोषक असूनही पटसंख्या असमाधानकारकच

By admin | Updated: July 16, 2015 23:41 IST

सोयीसुविधांअभावी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बहुतांश शाळांचा दर्जा खालावला असला तरी काही शाळांमध्ये पोषक वातावरण असूनदेखील पटसंख्या समाधानकारक नसल्याचे

- प्रशांत माने,  कल्याणसोयीसुविधांअभावी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बहुतांश शाळांचा दर्जा खालावला असला तरी काही शाळांमध्ये पोषक वातावरण असूनदेखील पटसंख्या समाधानकारक नसल्याचे वास्तव आहे. असेच चित्र डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखाणपाडा परिसरातील संत नामदेव प्राथमिक विद्यालयात दिसते. या शाळेत सद्य:स्थितीला पटसंख्या ४० इतकी असून मागील वर्षी ती ५० इतकी होती. बालवाडीत २५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. परंतु, प्रत्यक्षात १० ते १५ जणच शाळेत उपस्थित असतात. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असून तीन शिक्षक कार्यरत आहेत. पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही सुविधा येथे मिळत नाहीत. शाळेसाठी दिलेल्या दोनपैकी एकच संगणक चालू अवस्थेत आहे. प्रशिक्षकाअभावी संगणकीय ज्ञानाची जबाबदारीदेखील शिक्षकांवरच आहे.शाळेसाठी कसे चांगले वातावरण असावे, याची प्रचीती ही शाळा पाहता येते. चाळटाइप वास्तू आणि छतावर पत्र्याची शेड अशा स्वरूपात ही शाळा असली तरी सुसज्ज वर्गखोल्या, रेखाटलेले सुविचार आणि कर्तृत्वाने समाजात ठसा उमटविणाऱ्या राष्ट्रीय पुरुषांची छायाचित्रे येथील भिंतींवर आहेत. सफाई कर्मचाऱ्यांअभावी शाळेच्या स्वच्छतेची जबाबदारी विद्यार्थी आणि शिक्षकांवर येऊन ठेपली असली तरी शाळेचा परिसर स्वच्छ आहे. लहान मुलांना शाळेची ओढ लागावी म्हणून कॅरम, घसरगुंड्या महिला व बालकल्याण विभागाने उपलब्ध करून दिल्या आहेत. शाळेची मूळ वास्तू १९४८ सालातील आहे. मागील वर्षीच तिचे नूतनीकरण केले आहे. चांगल्या वातावरणात आपली मुले शिकतात, याचे समाधान पालकांना आहे.