ईटीसी केंद्राला सर्वोत्कृष्ट संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 02:27 IST2017-11-24T02:26:55+5:302017-11-24T02:27:07+5:30

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ई.टी.सी. अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा-सुविधा केंद्राला यामध्ये केंद्र शासनाचा २०१७मधील ‘सर्वोत्कृष्ट संस्था राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला

ETC Center, National Award for Best Director | ईटीसी केंद्राला सर्वोत्कृष्ट संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार

ईटीसी केंद्राला सर्वोत्कृष्ट संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ई.टी.सी. अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा-सुविधा केंद्राला यामध्ये केंद्र शासनाचा २०१७मधील ‘सर्वोत्कृष्ट संस्था राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पंतप्रधान पुरस्काराप्रमाणेच अनेक राष्ट्रीय, राज्य पुरस्कारांनी नावाजले जाणारे ई.टी.सी. केंद्र. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ३ डिसेंबर २०१७ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून, नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर व आयुक्त या मानांकित राष्ट्रीय पुरस्काराचा स्वीकार करणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान पुरस्काराप्रमाणेच अनेक राष्ट्रीय, राज्य पुरस्कारांनी ई.टी.सी. केंद्राला सन्मानित करण्यात आले आहे.
केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय स्तरावरील मानाचा सर्वोत्कृष्ट संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने लक्षणीय भर पडलेली आहे. १९६९पासून केंद्र सरकारकडून दिव्यांग व्यक्ती व त्यांच्यासाठी कार्य करणाºया संस्था यांना प्रेरणा देण्यासाठी असे पुरस्कार १४ विविध श्रेणींमध्ये वितरीत करण्यात येतात. यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणारी सर्वोत्कृष्ट संस्था, उत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी, दिव्यांगांसाठीचे रोल मॉडेल, तसेच दिव्यांगांसाठी संशोधन करणाºया संस्था अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येत असतात. ई.टी.सी. केंद्राला मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेचा गौरव वाढविणारा असून, नवी मुंबईकर नागरिकांच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करीत ई.टी.सी. केंद्राच्या लोककल्याणकारी कामाची दखल लोकांप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावर केंद्र शासन पातळीवरही घेतली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Web Title: ETC Center, National Award for Best Director