शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत एका पिढीचा अंत

By admin | Updated: July 9, 2016 03:40 IST

वाशीमधील धोकादायक इमारतींमध्ये १२ हजार नागरिक तीन दशके जीव मुठीत घेवून जगत आहेत. पुनर्विकासासाठी पाठपुरावा करत असताना आतापर्यंत ५० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

वाशीमधील धोकादायक इमारतींमध्ये १२ हजार नागरिक तीन दशके जीव मुठीत घेवून जगत आहेत. पुनर्विकासासाठी पाठपुरावा करत असताना आतापर्यंत ५० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला. एका पिढीचा दुर्दैवी अंत झाल्यानंतरही शासकीय यंत्रणा लालफितशाहीमधून बाहेर येत नाही. अजून किती नागरिकांचे बळी गेल्यानंतर पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लागणार, असा आर्त प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत. ‘लोकमत आपल्या दारी उपक्रमा’अंतर्गत वाशीमधील धोकादायक इमारतींमधील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबईतील झोपडपट्टी, चाळ व इमारतींमधील छोटे घर विकून नागरिकांनी नवी मुंबईमध्ये वाशी सारख्या महत्त्वाच्या विभागात घरे खरेदी केली. घर घेतल्यानंतर एक ते दोन वर्षांमध्येच त्यामध्ये गळती सुरू झाली. तेव्हापासून इमारतींच्या दुरूस्तीसाठी पाठपुरावा सुरू झाला. दुरूस्ती झाली नाहीच, परंतु या इमारती धोकादायक झाल्या. पालिकेने त्यांना धोकादायक घोषित करून नागरिकांना त्या खाली करण्याच्या नोटिसा दिल्या. जवळपास १५ वर्षे येथील नागरिक पुनर्बांधणीसाठी पाठपुरावा करत आहेत. अनेकांना मानसिक त्रास सुरू झाला. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह व इतर अनेक गंभीर आजाराने ग्रासले. वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटला नसल्यामुळे नैराश्य येवून अनेकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त नागरिकांचा रखडलेल्या पुनर्विकासामुळे बळी गेला आहे. नवी मुंबईमध्ये सर्वप्रथम राहण्यासाठी आलेल्या एक पिढीचा अंत झाला असून अजून किती जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन हा प्रश्न मार्गी लावणार, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत. महापालिका प्रत्येक वर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले जात आहे. तुम्ही घरे खाली करा, नाहीतर आम्ही तुम्हाला बाहेर काढून इमारती पाडून टाकू असा इशारा दिला जात आहे. या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआय मिळविण्यासाठी तब्बल १५ वर्षे सरकार दरबारी शेकडो हेलपाटे घालावे लागले. वर्षानुवर्षे आश्वासनांवर बोळवण केली जात होती. निवडणुका आल्या की एफएसआयचा विषय चर्चेत येतो. निवडणुका संपल्या की मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये जीव मुठीत घेवून जगणाऱ्या नागरिकांच्या समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही. शासनाने फेब्रुवारी २०१५ मध्ये अडीच एफएसआयचे धोरण मंजूर केले. परंतु अद्याप एकही प्रस्ताव मार्गी लागलेला नाही. धोकादायक इमारतींचे स्लॅब वारंवार कोसळू लागले आहेत. श्रद्धा, जेएन १, पंचरत्नसह अनेक सोसायटीमधील रहिवाशांनी घरे खाली केली आहेत. श्रद्धा सोसायटीमधील रहिवासी तब्बल १६ वर्षे संक्रमण शिबिरामध्ये वास्तव्य करीत आहेत. एक पिढी संपली, दुसऱ्या पिढीला तरी स्वत:चे घर मिळणार का, अशी विचारणा रहिवासी करत आहेत. रखडलेल्या पुनर्विकासाचे बळी आर. कार्व्हलो, नारायण शिंदे, इसाक मनीकम, बनारसी पात्रे, रवींद्रनाथ नायर, भंडारीदेवी पालीवाल, शांतीबेन पटेल, लक्ष्मी नारायण म्हात्रे, मगन भालेराव व त्यांचे कुटुंब, राम स्वरथ सिंग, अनंत पाटील, सुरेश कुदळे, बसेरा, द्वारका कडू, आदम शेख, गिरीश सिंग, नजीर मोहमद, आशा हुले, गौतमकुमार दत्ता, शिखा दत्ता, केशव सोनावणे, नागेश कांबळे, सुनीलकुमार महेश्वरी, सखुबाई पोटे. मृत्यू सत्र थांबविण्याची गरज धोकादायक इमारत पडल्यानंतरच नागरिकांचे मृत्यू होणार नाहीत. अपघाताची कायम टांगती तलवार असल्यामुळे मानसिक ताण वाढून अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. इमारतींचा पुनर्विकास कधी होणार असा प्रश्न रहिवासी वारंवार विचारत आहेत. सिडको, महापालिका व शासनाकडेही पाठपुरावा करत आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश येत नाही. नैराश्यामुळे व ग्रासलेल्या आजारामुळे ३० वर्षांपूर्वी येथे राहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा मृत्यू होवू लागला आहे. धोकादायक इमारतीसेक्टर १ : बी टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन बी १६, बी ३, बी ६, बी २, बी ५, बी १२, बी १, बी २७, बी १७, बी १८, बी ११, बी ८, बी ४, डी १, डी २, डी ३, डी ४, लोकमान्य टिळक मार्केट सेक्टर २ : मेघराज, मेघदूत टॉकीज, सी २ टाईपच्या इमारत क्रमांक १, ४, ५, ३सेक्टर ५ :राष्ट्रीय कामगार रुग्णालय इमारत क्रमांक १, २, ३, ४सेक्टर ९ : अवनी सहकारी गृहनिर्माण सोसायटी इ. क्र. ४७ ते ५८, श्रद्धा सोसायटी २२ ते ४४, एकता सोसायटी १ ते १८, कैलास सोसायटी १९ ते ४५, जय महाराष्ट्र ओनर्स असोसिएशन ३१ ते ४६, आशीर्वाद सोसायटी २, ४ ते १८, गुलमोहर सोसायटी ६४ ते ८१, एफ टाईप ओनर्स असोसिएशनसेक्टर १५ : दत्तगुरू नगर सोसायटी बी १० मधील इमारत क्रमांक ३२, ३६, ५०, ५६, ४५सेक्टर १४ : डॅफोडाईल सोसायटी, सोमेश्वर सोसायटी इमारत क्रमांक २९ ते ३२, ३५, ३७, २५, सिद्धिविनायक सोसायटीमधील इमारत क्रमांक १०, १७, १८, २१, २२, कुमकुम सोसायटी. सेक्टर १६ : सी टू टाईपमधील इमारत क्रमांक १ ते १९ सेक्टर २६ : ओमकार सोसायटी ए १ ते ए २०, महाराष्ट्र को-आॅप हौसिंग सोसायटी इ. क्र. ६५ ते ११५, हॅपी होम सोसायटी डी ११६ ते १३९, प्रगती सोसायटी ई १४०, १६१, वसंत विहार सहकारी संस्था एफ १६२ ते १८३