सिडकोच्या उद्यानाचे अखेर लोकार्पण
By Admin | Updated: March 23, 2017 01:41 IST2017-03-23T01:41:50+5:302017-03-23T01:41:50+5:30
नवीन पनवेल सेक्टर १६ मधील सिडकोच्या उद्यानात चाय पे चर्चासाठी आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी २२ मार्च

सिडकोच्या उद्यानाचे अखेर लोकार्पण
पनवेल : नवीन पनवेल सेक्टर १६ मधील सिडकोच्या उद्यानात चाय पे चर्चासाठी आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी २२ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता उद्घाटन करून नागरिकांसाठी खुले करीत असल्याचे जाहीर केले. या वेळी उपस्थित प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांनी या उद्यानाला नानासाहेब धर्माधिकारी उद्यान असे नाव देण्याची मागणी आमदारांकडे केली.
नवीन पनवेलमधील सेक्टर १६ मध्ये सात ते आठ एकरमध्ये सिडकोने उद्यान बांधले आहे. दोन वर्षे मुदतीच्या कामाला सहा वर्षे मुदतवाढ मिळूनही काम पूर्ण असताना अर्धवट सांगून मुदतवाढ देऊन ठेकेदाराला बजेट वाढवून दिले जात होते. या उद्यानात क्रि केट, हॉलीबॉल, स्केटिंगची मैदाने आहेत. विरंगुळा केंद्र, नाना-नानी पार्क, योग करण्याची सोय आहे. हे सर्व तयार असताना मुलांना मैदान वापरू दिले जात नाही. सिडको जाणूनबुजून त्याचे उद्घाटन करीत नाही अशी तक्र ार आमदारांजवळ प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ व त्याठिकाणी सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांनी केली. या वेळी वकील संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ, माजी नगराध्यक्षा चारु शीला घरत, प्रशांत फुलपगारे आदी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकांच्या मागणीवरून उद्यानात जाऊन पाहणी केली. त्यानंतर श्रीफळ वाढवून उद्यानाचे उद्घाटन करून सर्वांना खुले केल्याचे जाहीर केले. या वेळी प्रकल्पग्रस्त परांडवाल, भुजबळ, लोंढे, कांडपिळे, मोरे व ग्रामस्थ कानडे, सपकाळ, शिंदे, अरुण रावते आदींनी या उद्यानाला महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी नाव देण्याची मागणी केली. आमदारांनी त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांना दिले. (वार्ताहर)