शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

फेरीवाल्यांचे पदपथावर पुन्हा अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:54 AM

विभाग कार्यालयाचे अभय? : दैनंदिन साफसफाईच्या कामात अडथळा

नवी मुंबई : फेरीवाल्यांनी पुन्हा पदपथावर बस्तान ठोकले आहे. विशेष म्हणजे, ऐन पावसाळ्यात पदपथांवर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जा-ये करावी लागत आहे. वाशी व कोपरखैरणे विभागात हा प्रकार सर्रास पाहावयास मिळत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी शहरातील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभाग कार्यालयांना दिले आहेत, त्यानुसार फेरीवाल्यांना अटकाव करण्यासाठी ठिकठिकाणी दिवसभर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत, त्यामुळे दिवसभर फेरीवाले दिसत नाहीत. मात्र, सायंकाळनंतर फेरीवाल्यांना पदपथ मोकळे करून दिले जात असल्याचे पाहावयास मिळते. याचा परिणाम म्हणून सायंकाळी ७ वाजल्यानंतर शहरातील बहुतांशी विभागातील पदपथांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, रात्री १०.३० वाजेपर्यंत पदपथांवर या फेरीवाल्यांचा धुडगूस सुरू असतो. त्यामुळे पदचाऱ्यांची कसरत होत आहे. वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.वाशी सेक्टर ९ परिसरात हा प्रकार सर्रास होत असल्याने नागरिकांनी या संदर्भात संताप व्यक्त केला आहे. वाशीप्रमाणेच कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली तसेच नेरुळ आणि सानपाडा परिसरात फेरीवाल्यांकडून सायंकाळच्या वेळी होणारेअतिक्रमण रहिवाशांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे.स्वच्छता कर्मचाऱ्यांची दमछाकविभाग कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाºयांच्या आशीर्वादाने सायंकाळनंतर पदपथांवर अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांचा ताप स्वच्छता कर्मचाºयांना सहन करावा लागत आहे. हे फेरीवाले परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी करतात. घनकचरा तेथेच टाकून निघून जातात. सडलेला भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ, प्लॅस्टिक व इतर घनकचºयाचे ढीग साचत असल्याने सकाळी दैनंदिन साफसफाई करणाºया कर्मचाºयांची दमछाक होत आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका