तळोजा कारागृहातील कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 17:01 IST2019-08-02T17:00:58+5:302019-08-02T17:01:08+5:30
पनवेल : शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला कारागृहात चांगली वागणूक देण्यासाठी लाचेची मागणी करणारा तळोजा कारागृहातील कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ...

तळोजा कारागृहातील कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
पनवेल : शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला कारागृहात चांगली वागणूक देण्यासाठी लाचेची मागणी करणारा तळोजा कारागृहातील कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. ३२ वर्षीय महिलेकडून ५ हजारांची लाच स्वीकारताना आरोपी प्रदीप शंकर निंबाळकर याला ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
खारघर पोलीस ठाण्यात २०१५ मधील गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला कारागृहात चांगली वागणूक देण्यासाठी तसेच न्यायालयात व्यवस्थित नेण्यासाठी आरोपीने कैद्याच्या बहिणीकडे ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीत ही रक्कम ५ हजार रुपये ठरली .आरोपीने शुक्रवारी सकाळी ९. ४८ मिनिटांनी ही रक्कम स्वीकारल्यावर लाचलुपत विभागाने प्रदीप शंकर निंबाळकर (४८)रंगेहात पकडले .