शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कर्मचाऱ्यांचा प्रश्न महिन्यानंतरही अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:54 PM

पनवेल महापालिकेतील समावेशन प्रलंबित

पनवेल : पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पालिकेत समावेशनाच्या मागणीसाठी २२ जानेवारी रोजी कुटुंबीयांसह मंत्रालयावर लॉग मार्च काढला होता. सर्वपक्षीय नेत्यांनी या कर्मचाºयांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आंदोलनात मध्यस्ती करीत, महिनाभरात या कर्मचाºयांचे पालिकेत समावेशन केले जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, महिनाभराचा कालावधी लोटला तरी कर्मचाºयांच्या समावेशनाचा प्रश्न अंधातरीच आहे.महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच सुमारे तीन वर्षांपासून महापालिकेत समाविष्ट पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीतील ३२० कर्मचाºयांच्या समवेशनाचा विषय प्रलंबित आहे. म्युनिसिपल एम्पलॉइज युनियन या कामगार संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅडव्होकेट सुरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडले होते. या वेळी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी कर्मचाºयांचे शिष्टमंडळ, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासमवेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेतली होती. बैठकीत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाºयांच्या समावेशनाबाबत अनुकूलता दाखविली होती. या वेळी कर्मचाºयांचा लॉग मार्च नवी मुंबई, सानपाडा येथे थांबविण्यात आला होता. नगरविकास खात्याच्या वरिष्ठ अधिकाºयांनी यापूर्वी ३२० कर्मचाºयांपैकी पहिल्या टप्प्यात १४६ कर्मचाºयांच्या समावेशनाला २अनुकूलता दाखविली होती. मात्र, कामगार संघटना सर्वच्या सर्व ३२० कर्मचाºयांच्या समावेशनाबाबत ठाम भूमिका घेतली.दोन-तीन दिवसांपूर्वी मंत्रालयात जाऊन यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. या कर्मचाºयांच्या समावेशनाची प्रक्रिया सुरू आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यादेखील स्वत: पाठपुरावा करीत आहेत. लवकरच महापालिकेतील समाविष्ट पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचाºयांचा समावेशनाचा प्रश्न मार्गी लागेल.- प्रीतम म्हात्रे,विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका

टॅग्स :panvelपनवेल