किमान या महिन्याच्या अखेरपर्यंत खारकोपर- उरण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न - खासदार बारणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2023 20:56 IST2023-08-16T20:56:01+5:302023-08-16T20:56:08+5:30
नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील खारकोपर पर्यंत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

किमान या महिन्याच्या अखेरपर्यंत खारकोपर- उरण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न - खासदार बारणे
-मधुकर ठाकूर
उरण : नेरुळ - उरण रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते लवकरात लवकर उद्घाटन व्हावे यासाठीच प्रयत्न सुरु असल्याची माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील खारकोपर पर्यंत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र खारकोपर ते उरण दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.नेरुळ - उरण रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते लवकरात लवकर उद्घाटन व्हावे यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.मात्र यामध्ये काही तांत्रिक अडचणींही आहेत.त्यामुळे खारकोपर ते उरण या दरम्यान प्रवासी वाहतूकीसाठी विलंब होत आहे. किमान या महिन्याच्या अखेरपर्यंत प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.