कोकण विभागातील मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत; आयुक्तांच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 23:19 IST2020-09-08T23:19:29+5:302020-09-08T23:19:41+5:30
सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करण्याचे निर्देश

कोकण विभागातील मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत; आयुक्तांच्या सूचना
नवी मुुंबई : कोकण विभागातील मृत्युदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना विभागीय महसूल आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी दिले आहेत. कोरोनाव्यतिरिक्त कामांनाही गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोकण विभागातील जिल्हाधिकारी ते तहसीलदारपर्यंत टेलिफोन डिरेक्टरीचे आण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी त्यांनी कोकण विभागातून कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. मृत्युदर कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावीत. सर्व विभागांनी यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही स्पष्ट केले. आवश्यक त्या परिसरात चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
कोकण विभागात वादळात नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाईचे वाटप लवकर करावे. सातबारा संगणकीकरण, ई-फेरफारविषयी कामेही लवकर करण्यात यावीत, असे निर्देशही दिले असून, यावेळी महसूल उपायुक्त सिद्धाराम सालीमठ, मनोज रानडे, सोनाली मुळे, पंकज देवरे, गिरीश भालेराव व इतर अधिकारीही उपस्थित होते.