शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

खाद्यतेलांच्या किमतीही आवाक्याबाहेर; प्रतिकिलो ६० रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 01:32 IST

आयात घसरल्यामुळे तुटवडा

नवी मुंबई : डाळी, कडधान्यांप्रमाणे खाद्यतेलांच्या किमतीही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास ६० टक्के किमती वाढल्या असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आहारामधून तेलाचा वापरही कमी होऊ लागला आहे. शासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केल्यामुळे अनेकांना कामावरून घरी बसावे लागले आहे. उत्पन्न कमी झाले असले तरी महागाईमुळे खर्चात मात्र दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशातील तेलाची मागणी व उत्पादन यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करावी लागते. सोयाबीन व सूर्यफूल तेलाची जवळपास १५० लाख टन आयात करावी लागते. परंतु गतवर्षी कोरोना सुरू झाल्यापासून आयात कमी होत असून, त्याचा परिणाम बाजारभाव वाढण्यावर झाला आहे. भारतात अमेरिका, अर्जेंटिना व ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात आयात होते. तेथील समाधानकारक उत्पन्न नसल्यामुळे त्याचा फटकाही आयातीवर होऊ लागला आहे. गतवर्षी सूर्यफूल तेल ९० ते १०० रुपये किलो दराने विकले जात होते. सद्य:स्थितीमध्ये हेच दर जवळपास १६० रुपये किलो झाले आहेत. करडई १८० ते १९०, शेंगदाणा तेल जवळपास १९० रुपये, पामतेल १४८ रुपये किलो झाले आहे.  प्रत्येक तेलाच्या दरामध्ये प्रतिकिलो ६० ते ८० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या आहारातून तेलाचा वापर कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. कोरोनामुळे रोजगार मिळत नाही. उत्पन्नावर परिणाम झाला असून, दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. तेलाचे दर वाढत असल्यामुळे जेवणातील तेलाचा वापर कमी करावा लागला आहे.    - सुजाता शिंदे, तुर्भे 

डाळी, कडधान्यानंतर आता तेलाचे दरही गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना तेलाचे दर परवडत नसून शासनाने रेशनिंगवर जास्तीत जास्त तेल उपलब्ध करून दिले पाहिजे.     - गीता पवार, नेरूळ गतवर्षी दिवाळीपासूनच तेलाचे दर वाढत आहेत. कोरोनाकाळात अत्यावश्यक वस्तूंच्या दरामध्ये वाढ होणार नाही यासाठी शासनाने काळजी घेतली पाहिजे. दरवाढीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.     - अश्विनी शेडगे, वाशी 

सर्वच तेलांच्या किमती वाढत आहेत. आयात कमी होत असल्यामुळे गतवर्षीपासून दर वाढत आहेत. मागणी व पुरवठ्यामध्ये निर्माण झालेेली तफावत कमी होईपर्यंत दर तेजीतच राहतील.     - समीर चव्हाण, दुकानदार तेलाचे वर्षभरातील बाजारभाव प्रकार    २०२०    २०२१सूर्यफूल    ९० ते १००    १४० ते  १६० सोयाबीन    ८५ ते ९०    १४० ते १५०पामतेल    ८० ते ८५    १४० ते १४८शेंगतेल    ११० ते १२०    १८० ते १९०करडई    १६० ते १७०    १८० ते १९०वाढत्या किमतीमुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.          कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.