शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

पोलीस पत्नीचे कटकारस्थान, कर्ज फेडण्यासाठी रचला दरोड्याचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 2:36 AM

व्यापा-याकडून घेतलेल्या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी दरोड्याचा कट रचणा-या पोलीस पत्नीला साथीदारांसह पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई : व्यापा-याकडून घेतलेल्या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी दरोड्याचा कट रचणा-या पोलीस पत्नीला साथीदारांसह पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून ८० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्यांच्या इतर तीन साथीदारांचा शोध सुरु आहे. दरोडा टाकतेवेळी गुन्हेगारांनी व्यापाºयाच्या पत्नीकडे ठरावीक कागदपत्रांची चौकशी केल्यामुळे शिवाय संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाल्यामुळे हा गुन्हा उघडकीस आला.अनिता म्हसाणे (३९) असे पोलिसांनी अटक केलेल्या पोलीस पत्नीचे नाव आहे. ती खारघरची राहणारी असून पती नवी मुंबई पोलीस दलात आहेत. १७ आॅक्टोबर रोजी वाशीतील व्यापारी अरुण मेनकुदळे यांच्या घरी दरोडा पडला होता. यावेळी दरोडेखोरांनी मेनकुदळे यांच्या पत्नी व मुलीला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून २ कोटी ९ लाखांचा ऐवज लुटला होता. त्यामध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच काही महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश होता. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दहाहून अधिक तपास पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान दरोडेखोरांनी ठरावीक कागदपत्रांची चौकशी केल्याची बाब पोलिसांसमोर आली. त्यामुळे मेनकुदळे कुटुंबाने अनिता म्हसाणे हिच्यावर संशय व्यक्त केला होता. मेनकुदळे यांच्यासोबत केलेल्या व्यवहारातील दीड लाख रुपये अनिता हिच्याकडे होते. मात्र ते देवू न शकल्याने तिने घराची कागदपत्रे मेनकुदळे यांच्याकडे दिली होती. ही कागदपत्रे परत मिळवण्याच्या उद्देशाने व आर्थिक गरज भागवण्यासाठी तिने मेनकुदळे यांच्या घरावर दरोड्याचा कट रचला होता. रिअल इस्टेटच्या व्यवसायातून ओळख असलेल्या शंकर तेलंगे याला तिने मेनकुदळे यांच्याविषयीची माहिती दिली होती. त्यानुसार तेलंगे याने त्याच्या इतर काही साथीदारांसोबत मिळूनकुरिअर पोचवण्याच्या बहाण्याने मेनकुदळे यांच्या घरी जावून दरोडा टाकला होता.याप्रकरणी पोलिसांनी काही तासातच संशयित म्हणून अनिता म्हसाणे हिला ताब्यात घेतले असता, तिने पोलिसांना आव्हान दिले होते. म्हसाणे हिची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून यापूर्वी तिच्यावर फसवणूक व दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. अखेर वाशी पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी राज्यात व राज्याबाहेर सापळा रचून तिच्या सहा साथीदारांना अटक केली आहे.सुभाष श्रीधर पाटील (३६), खुशी जिब्राईल खान (२७), सनी सुहास शिंदे (२९), शंकर रामचंद्र तेलंगे (३८), जिब्राईल खान (३६) व फिरोज शेख (२७) अशी त्यांची नावे आहेत. सर्व जण मुंब्रा व ठाणे परिसरातील राहणारे आहेत.दरोड्यानंतर त्यांना विविध राज्यातून अटक केल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर त्यांच्याकडून गुन्ह्यातील ८० लाखांचा ऐवज जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी सह आयुक्त प्रशांत बुरडे, उपआयुक्त तुषार दोशी, सह आयुक्त नितीन कौसडीकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Crimeगुन्हा