शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

अक्षय्य तृतीयेनिमित्त सोनेखरेदीला उधाण, सराफा दुकानांमध्ये गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 02:46 IST

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी शुभ मानली जाते. हा मुहूर्त साधत नवी मुंबईकरांनी मंगळवारी सोनेखरेदीसाठी सराफांच्या दुकानात एकच गर्दी केली होती.

नवी मुंबई - साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी शुभ मानली जाते. हा मुहूर्त साधत नवी मुंबईकरांनी मंगळवारी सोनेखरेदीसाठी सराफांच्या दुकानात एकच गर्दी केली होती. सोनेखरेदीला उधाण आले असतानाच विविध योजना जाहीर करूनही ग्राहकांनी गृहखरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्या तुलनेत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर वाहनखरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला.अक्षय्य तृतीयेसाठी शहरातील सराफांची दुकाने दोन दिवसांपासून सजली होती. सोनेखरेदीवर सराफांनी वेगवेगळ्या आकर्षक योजना जाहीर केल्या होत्या. काहींनी दागिन्यांच्या बनावट शुल्कात सूट जाहीर केली होती. एकूणच सकाळपासून सराफांच्या दुकानात सोनेखरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. विशेषत: वाशी विभागात सराफांची मोठमोठी व ब्रॅण्डेड दुकाने आहेत, या दुकानात दागिन्यांचे नवनवीन आकर्षक डिझाईन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली होती. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे दोन वर्षांत सराफांच्या व्यवसायाला काही प्रमाणात उतरती कळा लागली होती. मात्र, गुढीपाडव्या पाठोपाठ अक्षय्य तृतीयेलाही ग्राहकांकडून सोनेखरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती नवी मुंबईतील सुप्रसिद्ध ज्वेलर्स महेंद्र जैन यांनी ‘लोकमत’ला दिली.सोनेखरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला तरी गृहखरेदीकडे मात्र ग्राहकांनी पाठ फिरविली. शहरातील लहान-मोठ्या विकासकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली होती. आकर्षक योजना जाहीर केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने विकासक हवालदिल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मालमत्ता विकल्या न गेल्याने, बिल्डर्स आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. त्यामुळे रियल इस्टेट मार्केटवर चिंतेची काजळी पसरली आहे. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त काही प्रमाणात का होईना तारून नेईल, असा विश्वास विकासकांना वाटत होता. मात्र, हा विश्वासही फोल ठरल्याने लहान-मोठे विकासक आणि गुंतवणूकदारांत काळजी पसरली आहे.वाहनखरेदीला चांगला प्रतिसादअक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अनेकांनी सोनेखरेदी केले. मात्र, काहींनी वाहनखरेदीला पसंती दिली. विशेषत: दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे शहरातील वाहन वितरकांकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे चारचाकी वाहनांचीही या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाGoldसोनंNavi Mumbaiनवी मुंबई