नवी मुंबई : माझ्या नादाला लागू नका, पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिली तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटीच नाही तर घोडेही बेपत्ता करेन, असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी नेरूळ येथील सभेत दिला आहे. हिम्मत असेल तर पुढील लोकसभा, विधानसभेला स्वतंत्र लढून दाखवा, असे आव्हानही यावेळी दिले.
भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी शुक्रवारी रात्री नेरूळमध्ये सभेचे आयोजन केले होते. यावेळी नाईक बोतल होते. वाढीव एफएसआयमुळे शहराच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ होत आहे. पाच वर्षांत शहराच्या विकासावर परिणाम झाला. नवी मुंबईच्या हक्काचे पाणी इतर महापालिकांकडे वळविले, असे ते म्हणाले.
भाजपचाच महापौर बसेल
नवी मुंबईकरांना पुढील २० वर्षे मालमत्ता कर वाढविणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचाच महापौर बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी गिरीश म्हात्रे, स्वप्ना गावडे, प्रीती भोपी, सचिन लवटे व इतर पदाधिकारीही उपस्थित होते.
Web Summary : Ganesh Naik warned Eknath Shinde, threatening to dismantle his power if provoked. He challenged Shinde to contest independently in upcoming elections, criticizing the impact of increased FSI and water diversion on Navi Mumbai. Naik assured no property tax hikes and predicted a BJP mayor.
Web Summary : गणेश नाईक ने एकनाथ शिंदे को चेतावनी दी और उकसाने पर उनकी शक्ति को खत्म करने की धमकी दी। उन्होंने शिंदे को आगामी चुनावों में स्वतंत्र रूप से चुनाव लड़ने की चुनौती दी, नवी मुंबई पर बढ़े हुए एफएसआई और जल diversion के प्रभाव की आलोचना की। नाईक ने संपत्ति कर में वृद्धि नहीं करने का आश्वासन दिया और भाजपा महापौर की भविष्यवाणी की।