शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

गुंडांच्या धमक्यांना घाबरू नका - नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 02:12 IST

तुर्भे स्टोअरमध्ये भाजपचा मेळावा

नवी मुंबई :  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला धमकावण्याचे प्रयत्न होतील. परंतु कोणत्याही गुंडांना घाबरू नका. या गुंड प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी मी समर्थ आहे, असे प्रतिपादन ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी केले.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुर्भे स्टोअर येथील प्रभाग क्रमांक ६८ आणि प्रभाग क्रमांक ७० मधील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना नाईक यांनी निडर राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. या विभागातील प्रतिनिधीला तीन वेळा महापालिकेत स्थायी समितीचे सभापतीपद दिले. परंतु या विभागाचा विकास मात्र झाला नाही. उलट आमचीच साथ सोडून दिली. अशा प्रवृत्तींना जनता त्याची जागा दाखवून देईल, असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. तुर्भे विभागातील सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच याप्रसंगी प्रभाग क्रमांक ६८ मधून शितल इंगळे तर प्रभाग क्रमांक ७० मधून राजेश शिंदे यांच्या नावावर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून यावेळी शिक्‍कामोर्तब करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, परिवहन समितीचे माजी सभापती अन्वर शेख, राजेंद्र इंगळे, शिवाजी शिंदे, अंकुश मेढेकर, माजी नगरसेवक मुनावर पटेल, माजी नगरसेवक अमित मेढेकर, ॲड. गुरू सूर्यवंशी, प्रभू चव्हाण, संतोष हलवाई, झीनत शेख, सुजाता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी नगरसेवक राजेश शिंदे आणि शीतल राहुल इंगळे यांनी आयोजन केले होते.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकBJPभाजपा