शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

घरगुती काटेरी हलवा जातोय काळाच्या पडद्याआड!

By admin | Updated: January 8, 2016 01:58 IST

संक्रांतीच्या १५ दिवस आधी घराघरात कर्त्या स्त्रीकडून बनविला जाणारा नाजूक, रंगीबेरंगी काटेरी हलवा आता हळूहळू काळाच्या पडद्याआड जातो आहे

पालघर : संक्रांतीच्या १५ दिवस आधी घराघरात कर्त्या स्त्रीकडून बनविला जाणारा नाजूक, रंगीबेरंगी काटेरी हलवा आता हळूहळू काळाच्या पडद्याआड जातो आहे. एकेकाळी घरातल्या गृहिणीचा अभिमानाचा विषय असलेला हा हलवा त्याच्या बनविण्याची कष्टप्रद प्रक्रिया, तिला लागणारा प्रचंड वेळ आणि तयार हलव्याची मुबलक उपलब्धता यामुळे आता घराघरात तयार होईनासा झाला आहे. तीळ, साबुदाणा, फुटाणे, मुरमुरे, वेलचीचे दाणे यावर हा हलवा बनविला जात असे. त्यासाठी पांढऱ्या शुभ्र दाणेदार साखरेच्या एकतारी पाकाचा वापर केला जात असे. तांब्याच्या किंवा पितळेच्या कढई अथवा परातीत लाकडाच्या कोळशाच्या चुलीतल्या मंद धगीवर अत्यंत संथ गतीने छोटा चमचाचमचा पाक टाकून व नाजूक हाताने हलवून तो बनविला जात असे. जुन्या काळी घराघरांत चुलीवर स्वयंपाक होत असे. त्यासाठी इंधन म्हणून लाकडी कोळशाचा वापर व्हायचा. स्वयंपाक झाला की, चुलीतल्या विस्तवाची तीव्र धग निघून जायची आणि उरलेल्या मंद आचेवर पसरट कढई अथवा परात ठेवून त्यात ज्याच्यावर हलवा करायचा ती चीज टाकली जायची. ती थोडीशी हलवून तापवली की, त्यावर एक छोटा चमचा साखरेचा एकतारी पाक टाकला जायचा आणि तो हलवला जायचा. हा पाक कोरडा झाला की, मग दुसरा चमचा, मग तिसरा चमचा पाक टाकला जायचा. सर्व रंगाचा हलवा एकत्र केला की, काटेरी बहुरंगी हलवा तयार व्हायचा. आताच्या धावपळीच्या आयुष्यात एवढी मेहनत करण्याइतकी फुरसत कोणालाच नाही. शिवाय २०० रुपये ते ६०० रुपये किलो दराने वेगवेगळ्या प्रतीचा हलवा बाजारात मिळत असल्याने घरी हलवा कुणालाच करावासा वाटत नाही. करायचे म्हटले तरी ते शक्य होत नाही. रेडिमेड मिळणारा हलवा हा दुकानदान अथवा निर्माते कान असलेल्या मोठ्या कढईत तीळ, चुरमुरे टाकून त्यावर पाक टाकून कढई हलवून झटपट बनवित असल्याने तो तितकासा काटेदार होत नाही. तरी पण धावपळीच्या जगता संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी सगळयांना तो घ्यावासा, खावासा आणि वापरावासा वाटतो, एवढे मात्र नक्की!