डॉलरच्या बहाण्याने फसवणूक, एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 01:53 AM2019-12-26T01:53:00+5:302019-12-26T01:53:03+5:30

एकास अटक: स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याचे दाखविले आमिष

Dollar fraud, arrest one in navi mumbai | डॉलरच्या बहाण्याने फसवणूक, एकास अटक

डॉलरच्या बहाण्याने फसवणूक, एकास अटक

Next

नवी मुंबई : स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. कोपरखैरणेत एक गुन्हा करून पळून जात असतानाच त्याला सापळा रचून अटक केली आहे. निम्याहून कमी किमतीत अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. मागील काही महिन्यांत अशा प्रकारच्या दहा घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी चार गुन्हे घणसोलीत, दोन कोपरखैरणेत तर दोन खारघर परिसरात घडले आहेत.

एखाद्या व्यक्तीला अमेरिकन डॉलरच्या मोहात पाडून त्याला स्वस्तात डॉलर देण्याचे आमिष दाखवले जाते. त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी सदर व्यक्तीला व्यवहारासाठी बोलावून पैसे घेतल्यानंतर त्याच्या हाती कागदाचे बंडल देऊन पळ काढला जातो. अशा घटनांची उकल करण्यासाठी गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पथक प्रयत्नात होते. त्यानुसार कोपरखैरणे परिसरात एक जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे उपायुक्त प्रवीणकुमारपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अर्जुन गरड यांच्या पथकाने मंगळवारी रात्री परिसरात सापळा रचला होता. या वेळी तीन टाकी परिसरातून मोहम्मद इक्बाल मोहम्मद सिराज सिकदार (२३) याला अटक करण्यात आली.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन
एका महिलेच्या इशाºयावरून तो कोपरखैरणे गावात आला होता. त्या ठिकाणी भारतीय चलनाच्या ७० हजार रुपयांच्या बदल्यात एक हजार अमेरिकन डॉलर देणार होता. प्रत्यक्षात मात्र संबंधित व्यक्तीकडून दहा हजार रुपये घेतल्यानंतर त्याच्याकडे कागदाचे बंडल देऊन गर्दीत पळ काढला.

पोलिसांच्या पथकाने तीन टाकी परिसरातून त्याला अटक केली. त्याच्याकडून इतरही अनेक गुन्हे उघड होऊन त्याच्या टोळीचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या फसव्या आमिषाला बळी न पडण्याचेही आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Web Title: Dollar fraud, arrest one in navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.