शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरच्या डॉक्टरांना मिळणार ‘समान वेतन’, प्रशासन सकारात्मक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 09:54 IST

कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी राज्यात सर्वच स्थानिक प्रशासनांमार्फत कोविड सेंटर चालविले जात आहेत. त्याठिकाणी बी.ए.एम.एस. (आयुर्वेदिक), बी.यू.एम.एस. (युनानी) व बी.एच.एम.एस. (होमिओपॅथिक) या तीन वर्गातले डॉक्टर कार्यरत आहेत.

सूर्यकांत वाघमारे -नवी मुंबई : महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना समान वेतन देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे. याचा लाभ शंभरहून अधिक होमिओपॅथिक डॉक्टरांना होणार आहे. कोविड सेंटरमध्ये सर्व डॉक्टर समान काम करत असतानाही आयुर्वेदिक व युनानीच्या तुलनेत होमिओपॅथिक डॉक्टरांचे वेतन कमी होते.कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी राज्यात सर्वच स्थानिक प्रशासनांमार्फत कोविड सेंटर चालविले जात आहेत. त्याठिकाणी बी.ए.एम.एस. (आयुर्वेदिक), बी.यू.एम.एस. (युनानी) व बी.एच.एम.एस. (होमिओपॅथिक) या तीन वर्गातले डॉक्टर कार्यरत आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या सर्वच कोविड सेंटरमध्ये या श्रेणीचे डॉक्टर आहेत. मागील एक वर्षांपासून हे सर्व डॉक्टर कोरोना विरुद्धच्या लढ्यात खांद्याला खांदा देऊन झटत आहेत. परंतु सर्व डॉक्टरांचे काम समान असतानाही त्यांच्या वेतनात मात्र फरक होता. आयुर्वेदिक व युनानी डॉक्टरांना ७५ हजार, तर होमिओपॅथिक डॉक्टरांना ६० हजार रुपये वेतन दिले जात आहे. याबाबत होमिओपॅथिक डॉक्टरांकडून नाराजी व्यक्त केली होती, तर समान कामास समान वेतन या कायद्याप्रमाणे वेतन देण्याची मागणी होत होती. त्यानुसार नुकतेच आयुष संचालनालयानेदेखील कोविड सेंटरमधील डॉक्टरांना समान कामास समान वेतन देण्याचे आदेश काढले आहेत. परंतु अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या (हिम्पाम) नवी मुंबई संघटनेने पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी अध्यक्ष डॉ. प्रतीक तांबे, डॉ. एम. आर. काटकर, डॉ. एम. बी. चौधरी, डॉ. प्रशांत आहेर, डॉ. अशोक लांडगे, डॉ. प्रियांका परुळेकर आदी उपस्थित होते. त्यांनी आयुष संचालनालयाच्या आदेशाचा हवाला देत, डॉक्टरांच्या व्यथा मांडल्या. त्यानुसार त्यांच्या मागणी बाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रत्यक्षात लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले.

शासकीय कोविड सेंटरमधील सर्व डॉक्टर समान काम करत असतानाही, त्यांच्या वेतनातील फरक योग्य नाही. त्यामुळे समान काम, समान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्याची मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे. प्रशासन त्याबाबत सकारात्मक असल्याचे कळवले आहे. महापालिकेने याबाबत निर्णय घेतल्यास राज्यात त्याचे अनुकरण होऊन सर्वच होमिओपॅथिक डॉक्टरांना न्याय मिळू शकेल.     - डॉ. प्रतीक तांबे, अध्यक्ष, हिम्पाम, नवी मुंबई 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस