शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी वाचवायची की रुग्ण ?

By admin | Updated: April 11, 2016 01:35 IST

आरोग्यसेवेतील १०२ आणि १०८ या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल स्टाफला बायोमेट्रिक उपस्थित प्रणाली सरकारने बंधनकारक केली आहे

आविष्कार देसाई,  अलिबागआरोग्यसेवेतील १०२ आणि १०८ या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल स्टाफला बायोमेट्रिक उपस्थित प्रणाली सरकारने बंधनकारक केली आहे. रुग्णाचा प्राण वाचविणारा कॉल आधी पूर्ण करायचा की बायोमेट्रिक प्रणालीमध्ये हजेरी पहिली नोंदवायची, असा पेच जिल्ह्यातील सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल स्टाफमध्ये निर्माण झाला आहे. फिल्डवर काम करणाऱ्यांवर याबाबत सक्ती करू नये, असा सूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतून उमटत आहे.रुग्णांसाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. त्यांना उपचार तातडीने मिळावेत यासाठी सरकारने अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली आहे. ही अत्यावश्यक सेवा असल्याने सर्वसामान्यांना या सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी लक्षात राहणारे १०२ आणि १०८ असे हेल्पलाइन नंबर सुरू केले आहेत. जिल्ह्यामध्ये १०२ सेवा देण्यासाठी ७६ अ‍ॅम्ब्युलन्स असून तेवढेच वाहनचालक आहेत, तर १०८ सेवा देणाऱ्या २२ अ‍ॅम्ब्युलन्स आहेत. यामध्ये २२ वाहनचालक आणि २२ वैद्यकीय अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे अन्य असे सुमारे ३०० अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. सरकारने ७ एप्रिल २०१६ ला जीआर काढला आहे. या जीआरनुसार १०२ आणि १०८ या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल स्टाफला बायोमॅट्रिक उपस्थिती प्रणाली सरकारने बंधनकारक केली आहे. ते सादर केल्यावरच पगार होणार आहे. हा नियम फिल्डवर काम करणाऱ्यांना मात्र अडचणीचा आहे. पहाटे तातडीचा कॉल आला, तर आधी पंचिग करायचे की कॉल अन्टेंड करायचा, असा प्रश्न आहे. आरोग्यसेवेत काम करताना आधी रुग्णाचे प्राण वाचवण्याला प्राधान्य आहे. काम करूनही वेळेवर पंचिंग झाले नाही तर पगार कापला जाणार आहे. सरकारने याबाबत पूर्ण विचार करण्याची गरज असल्याचा सूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतून उमटत आहे. अ‍ॅम्ब्युलन्स सेवा पुरविणारी भारत विकास संस्था आहे. या संस्थेकडे रोज आॅनलाइन हजेरी अपडेट होते. त्यामुळे नव्याने पंचिंगची काय गरज आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. जे. जे. रुग्णालयात एखाद्या रुग्णाला नेल्यावर तेथे जागा नसते, त्यावेळी त्याला सायन रुग्णालयात न्यावे लागते. तेथेही जागा नसेल तर तिसऱ्या रुग्णालयात न्यावे लागते. पंचिंग करायला पुन्हा मुख्यालयात जावे लागणार आहे. हे अडचणीचे ठरणार आहे असे एका अ‍ॅम्ब्युलन्स चालकाने सांगितले.