शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

विकासकामे होत नसल्यामुळे नाराजी, सर्वसाधारण सभेत लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 4:55 AM

सर्वसाधारण सभेत लक्षवेधी : लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांविषयीही व्यक्त केली नाराजी

नवी मुंबई : निवडणुका होऊन चार वर्षे झाल्यानंतरही शहरातील विकासकामे होत नसल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. पाठपुरावा करूनही अत्यावश्यक कामे केली जात नाहीत. प्रशासन विकासकामांना कधी गती देणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

काँग्रेसच्या नगरसेविका वैजयंती भगत यांनी सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती. निवडणुका होऊन चार वर्षे झाल्यानंतरही शहरातील विकासकामांना गती दिली जात नाही. पदपथांवरील गटारांची झाकणे गायब आहेत. अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. रोडचीही दुरवस्था होऊ लागली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदारांची नेमणूक केली नसल्यामुळे तेथील स्थितीही बिकट होत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे फक्त शहरातील प्रमुख ठिकाणी केली जात आहेत. वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रभागांमधील विकासकामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत असतात. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही विकासकामे केली जात नाहीत. लोकप्रतिनिधींनी सुचविलेले प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात आहेत. काही कामांच्या फायली गहाळ केल्या जात आहेत. निविदा काढण्यासाठी वेळ लावला जातो. प्रभाग-६५, ७७ व ७८ मधील रस्ते आणि गटारांच्या कामांचे कार्यादेश तब्बल दीड वर्षांपूर्वी दिले आहेत; पण कामे झालेली नाहीत. संपूर्ण शहरात अशीच स्थिती असून प्रशासनाने कामांना गती द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. लक्षवेधीवर चर्चा माजी उपमहापौर अविनाश लाड, प्रशांत पाटील, हेमांगी सोनावणे, रंगनाथ औटी, घनश्याम मढवी, रामदास पवळे, एम. के. मढवी, अनंत सुतार, रवींद्र इथापे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी भूमिका स्पष्ट केली.नगरसेवकांना वारंवार अधिकाºयांच्या दालनामध्ये पाठपुरावा करण्यासाठी जावे लागत आहे. नक्की पालिका चालवतेय कोण? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर घणसोली परिसरामध्ये कामे झालेली नाहीत. अनेक फाइल्स प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. निविदा मागविण्यासाठी चार वर्षे घालवली जात आहेत.विकास होत असल्याचा प्रशासनाचा दावाच्महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी विकासकामे होत नसल्याचा दावा खोडून काढला आहे. १ एप्रिल २०१८ पासून २० डिसेंबरपर्यंत ३६२४ कामे पूर्ण झालेली असल्याचे स्पष्ट केले.च्शहरात ९७० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. गुरुवारच्या सभेत ३०४ कोटी रुपयांची कामे पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहेत. २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची १६३ कामे सुरू आहेत. ५ ते २५ लाख रुपये किमतीची ३१० कामे, ५ लाखपेक्षा कमी रकमेची २६४६ व २ लाखपेक्षा कमी रकमेची ५१५ कामे सुरू आहेत.च्प्रत्येक कामावर अत्याधुनिक संगणकीय प्रणालीद्वारे नियमित आढावा घेतला जात आहे. नागरी सुविधांसाठी अर्थसंकल्पातील तरतुदीपेक्षा ३२२ कोटी रकमेची कामे नागरिकांची गरज व सुविधा लक्षात घेऊन केली जात आहेत.च्घणसोली नोडमध्ये १५९ कोटींपेक्षा जास्त रकमेची कामे सुरू असल्याचेही आयुक्त रामास्वामी एन. यांनी केले असून काही कामे रखडली असल्यास तीही मार्गी लावली जातील, असे आश्वासन दिले.काँगे्रसला मतदान केले का?नगरसेविका वैजयंती भगत यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर प्रभाग ६५, ७७, ७८ काँगे्रस व इतर पक्षीयांच्या प्रभागांमध्ये विकासकामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी भगत यांना काँगे्रस पक्षाचे नाव तुम्ही घेत आहात, पण काँगे्रसला मतदान केले आहे का अशी विचारणा केली. यामुळे भगत व म्हात्रे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई