जिल्ह्यात अपंगांचा प्रवास होणार गतिमान
By Admin | Updated: August 12, 2016 02:30 IST2016-08-12T02:30:09+5:302016-08-12T02:30:09+5:30
अपंगांना जिल्हा रुग्णालयामध्ये येताना फार मोठे दिव्य पार करावे लागते. शारीरिक आणि मानसिक जाचातून आता अपंगांची सुटका करून त्यांची

जिल्ह्यात अपंगांचा प्रवास होणार गतिमान
आविष्कार देसाई, अलिबाग
अपंगांना जिल्हा रुग्णालयामध्ये येताना फार मोठे दिव्य पार करावे लागते. शारीरिक आणि मानसिक जाचातून आता अपंगांची सुटका करून त्यांची मोबिलिटी वाढविण्यासाठी जिल्हा सरकारी रु ग्णालयाने पुढाकार घेतला आहे. पाच उपजिल्हा रु ग्णालये आणि आठ ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात ने-आण करण्याच्या प्रवासाची सोय लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयाला २३ लाख ४० हजार रुपयांचा खर्च येणार आहे.
रायगड जिल्ह्यात अपंग, अपंग दाखले, शारीरिक व्याधींच्या उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात येतात. रायगड जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता चांगल्या माणसांची सुध्दा दमछाक करणारी आहे. उरण, खालापूर, पनवेल, कर्जत, पेण, रोहा, मुरु ड, पोलादपूर, महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा अशा विविध भागातून अपंग बांधव जिल्हा रु ग्णालयामध्ये येत असतात. दर बुधवारी अपंगांना अपंग दाखल्याचे वाटप जिल्हा रु ग्णालयामार्फत केले जाते. यावेळी त्यांची शारीरिक तपासणी केली जाते.
अपंगांना सरकारी पातळीवरु न विविध सवलती दिल्या जातात. त्या सवलती प्राप्त करण्यासाठी त्यांना अपंगत्वाचा दाखला घेणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे या दिवशी मोठ्या संख्येने अपंग बांधव जिल्हा रुग्णालयात येत असतात. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून वेळेत जिल्हा रुग्णालयात पोचणे आवश्यक असते. यासाठी त्यांना फार मोठे दिव्य पार करावे लागते.
कधी-कधी उशीर झाल्याने एसटी बस चुकते, तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने खासगी वाहनाने येणेही त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना चांगलीच कसरत करावी
लागते.
तालुक्याच्या ठिकाणाहून जिल्हा रुग्णालयापर्यंतच्या प्रवासासाठी वाहनाची सोय करण्याची मागणी सातत्याने अपंग बांधवांकडून करण्यात येत होती. सध्या अलिबाग एसटी आगारापासून जिल्हा रु ग्णालयापर्यंत ने-आण करण्यासाठी एक विक्र म मिनीडोर कार्यरत आहे. प्रशासनाने वाहनाची सोय केल्याने अपंगांचा प्रचंड त्रास वाचणार आहे.