शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

प्रमुख प्रशासकीय पदांपासून महिला वंचितच; महापालिकेपासून सिडकोपर्यंत पुरुष अधिकाऱ्यांचीच वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 12:01 AM

नवी मुंबई महानगरपालिका जनतेशी थेट संबंध असणारी संस्था, महापालिकेमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती पदांवर महिलांना संधी मिळाली.

नवी मुंबई : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईमध्ये कोकण भवन, सिडको, पोलीस आयुक्तालय, महापालिकेसह एपीएमसीसारखी महत्त्वाची कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या प्रशासकीय प्रमुख पदावर अद्याप एकदाही महिला अधिकाऱ्यांना संधी मिळालेली नाही. दुसºया किंवा त्यानंतरच्या स्थानावरच महिला अधिकाºयांची वर्णी लागलेली आहे.

नवी मुंबईमध्ये राजकीय, सामाजिक व इतर सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांनी कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. प्रशासनामध्येही अनेक अधिकारी व कर्मचाºयांनी चांगली कामगिरी केली आहे. परंतु अद्याप एकही सरकारी व निमसरकारी कार्यालयातील प्रमुख पदांवर महिला अधिकाºयांची वर्णी लागू शकलेली नाही. पोलीस दलामध्ये अनेक महिला अधिकारी आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदापर्यंतच महिला अधिकाºयांना संधी मिळालेली आहे. आतापर्यंत सहायक पोलीस आयुक्त, उपआयुक्त व आयुक्त पदावर महिला अधिकाºयांची नियुक्ती झालेली नाही. पोलीस दलामध्ये संगीता शिंदे अल्फान्सो, राणी काळे, पुष्पलता दिघे व इतर काही अधिकाºयांनी चांगली कामगिरी केली आहे. काळे यांनी अमली पदार्थविरोधी पथकामध्ये त्यांची छाप पाडली असून गुन्हे शाखेमध्येही त्यांचे काम चांगले आहे. राज्यात पोलीस अधीक्षक, उपआयुक्त व इतर पदांवर अनेक महिला पोलीस अधिकाºयांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यापैकी कोणाचीच अद्याप नवी मुंबईत बदली झालेली नाही. सिडको हे नवी मुुंबईमधील सर्वात महत्त्वाच्या कार्यालयांपैकी एक आहे. शहराची उभारणी करण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, नैनासारखे प्रकल्प या संस्थेच्या अंतर्गत सुरू आहेत. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरही महिला अधिकाºयांची एकदाही नियुक्ती झालेली नाही. सहआयुक्तपदावर यापूर्वी व्ही. राधा यांनी प्रभावीपणे काम केले आहे. विमानतळाचा प्रकल्प मार्गी लावण्यामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका जनतेशी थेट संबंध असणारी संस्था, महापालिकेमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती पदांवर महिलांना संधी मिळाली. परंतु प्रशासकीय स्तरावर एकही महिला अद्याप आयुक्त झालेली नाही. उपआयुक्त, ईटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण संस्था, क्रीडा विभागांचे प्रमुख म्हणून महिलांना संधी मिळालेली आहे. राज्यात अनेक ज्येष्ठ महिला सनदी अधिकारी आहेत. रायगड व ठाणेचे जिल्हा अधिकारी म्हणून महिला अधिकाºयांनी चमकदार कामगिरी केली आहे. महापालिकेच्या आयुक्तपदावरही एखाद्या महिला सनदी अधिकाºयांची निवड व्हावी, असे मत व्यक्त केले जात आहे.

मिनी मंत्रालय समजले जाणारे कोकण भवन,आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, उरणमधील जेएनपीटी, पनवेल महानगरपालिका, एमआयडीसी या सरकारी आस्थापनांच्या प्रशासकीय प्रमुख पदांवर महिलांना संधी कधी मिळणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.या पदांवर मिळाली संधीपोलीस दरामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, गुन्हे व अमली पदार्थविरोधी कक्षात पोलीस उपनिरीक्षक व इतर पदांवर महिलांना संधी मिळाली आहे. आतापर्यंत तीन पोलीस स्टेशनच्या प्रमुख पदावर महिलांना संधी मिळाली आहे. सिडकोमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक, महापालिकेमध्ये उपआयुक्तपदापर्यंत महिलांना संधी मिळाली असून बाजार समितीमध्ये मार्केटचे उपसचिव पदापर्यंत महिला अधिकाºयांची वर्णी लागलेली आहे.या पदांवर अद्याप संधी नाहीनवी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, सिडको व्यवस्थापकीय संचालक, मुंबई बाजार समिती सचिव, कोकण आयुक्त, पनवेल महानगरपालिका आयुक्त या पदांवर अद्याप महिला अधिकाºयांची नियुक्ती झालेली नाही.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका