बोटे निकामी झाल्याने केली भरपाईची मागणी
By Admin | Updated: March 25, 2017 01:36 IST2017-03-25T01:36:16+5:302017-03-25T01:36:16+5:30
तालुक्यातील खरसुंडी येथील डेल्टा कारखान्यात यंत्रामध्ये संदीप नाईक (पवार) या कामगाराची डाव्या हाताची दोन बोटे निकामी झाली.

बोटे निकामी झाल्याने केली भरपाईची मागणी
वावोशी : तालुक्यातील खरसुंडी येथील डेल्टा कारखान्यात यंत्रामध्ये संदीप नाईक (पवार) या कामगाराची डाव्या हाताची दोन बोटे निकामी झाली. कारखाना व्यवस्थापन भरपाईसाठी चालढकल करत असल्यामुळे नातेवाईक संतप्त झाले आहेत.
२७ फेब्रुवारी रोजी संदीप नाईक कामावर असताना शीट प्रेस मशिनमध्ये शीट अडकल्यामुळे उत्पादन व्यवस्थापकाने त्यांना पुली हाताने फिरवण्यास सांगितले. यावेळी डाव्या हाताचा पंजा अडकल्याने दोन बोटे निकामी झाली. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी नातेवाइकांनी कारखाना व्यवस्थापन व मालकाशी चर्चा केली; परंतु योग्य प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईक आंदोलन करणार असल्याचे सांगितले.