चालत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती; मातेसह बाळ सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 15:54 IST2019-08-20T15:54:03+5:302019-08-20T15:54:30+5:30
डेहराडून ते कोचीवडी या गाडी क्रमांक २२६६० मध्ये गीतादेवी कश्यप ( ३० ) या महिलेची मंगळवारी प्रसूती झाली.

चालत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती; मातेसह बाळ सुखरूप
पनवेल : डेहराडून ते कोचीवडी या गाडी क्रमांक २२६६० मध्ये गीतादेवी कश्यप ( ३० ) या महिलेची मंगळवारी प्रसूती झाली. गीतादेवी ही आपल्या कुटुंबासह मेरठवरून मडगाव येथे जात असताना ही प्रसूती झाली असून, गीतादेवीने कन्येला जन्म दिला आहे. भिवंडी ते उल्हास ब्रिजदरम्यान ही प्रसूती झाली. या घटनेनंतर पनवेल रेल्वे स्थानकात गाडी थांबविण्यात आली होती. यावेळी पनवेल रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्टर एस एम नायर यांनी त्वरित डॉक्टरांना रेल्वे स्थानकावर पाचारण केले. तपासणीदरम्यान दोघांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही ट्रेन पुढे रवाना झाली. दरम्यान बाळ व मातेला पनवेलमध्ये रुग्णालयात थांबण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र दोघांची प्रकृती व्यवस्थित असल्याने कश्यप कुटुंबीयांनी पुढे प्रवास करण्याचा निर्णय घेतला.