शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

देहरंग परिसर अजूनही ‘बेरंग’च

By admin | Updated: July 20, 2015 02:44 IST

माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या देहरंग धरणाच्या परिसराचे सुशोभीकरण करून येथे पर्यटनस्थळ विकसित करण्याचा प्रस्ताव धूळखात पडून आहे.

पनवेल : माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या देहरंग धरणाच्या परिसराचे सुशोभीकरण करून येथे पर्यटनस्थळ विकसित करण्याचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. पालिकेने याकडे दुर्लक्ष केले असून, पाठपुरावा न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप स्थगिती उठविण्यात आलेली नाही. परिणामी देहरंग परिसर बेरंगच राहिला आहे. पनवेल नगरपरिषदेच्या मालकीची २७७ एकर जमीन असून, त्यातील काही क्षेत्रावर देहरंग धरण आहे. जलाशयाच्या खालच्या बाजूला सुमारे १०० एकर जमीन विकसित करण्याजोगी आहे. म्हणून तत्कालीन नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांनी १७ जुलै २००३ रोजी विशेष सभा घेऊन ही जागा बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर लगेचच खासगी एजन्सींकडून निविदाही मागविण्यातही आल्या. याकरिता तीन मोठ्या एजन्सींनी अर्ज दाखल केले होते. परंतु जयंत पगडे यांनी २८ आॅक्टोबर २००५ रोजी या ठरावाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करीत स्थगिती आणली. त्यामुळे देहरंग धरण परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव रखडला. पनवेल नगरपालिकेच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने याबाबतची स्थगिती उठविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पनवेल पालिकेकडूनही या प्रकल्पाकरिता फारशी उत्सुकता दाखविण्यात आली नाही.