रहिवाशांच्या मारहाणीत चोरट्याचा मृत्यू, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 05:57 IST2018-01-28T05:56:53+5:302018-01-28T05:57:04+5:30

 सोसायटीमध्ये घुसलेल्या भुरट्या चोराला रहिवाशांनी बांधून केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रहिवाशांविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. चोराला पकडल्याची माहिती पोलिसांना न देता त्याला एका खोलीत डांबून जबर मारहाण करण्यात आली होती.

 The death of the thieves killed the residents, the three arrested | रहिवाशांच्या मारहाणीत चोरट्याचा मृत्यू, तिघांना अटक

रहिवाशांच्या मारहाणीत चोरट्याचा मृत्यू, तिघांना अटक

 नवी मुंबई - सोसायटीमध्ये घुसलेल्या भुरट्या चोराला रहिवाशांनी बांधून केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रहिवाशांविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. चोराला पकडल्याची माहिती पोलिसांना न देता त्याला एका खोलीत डांबून जबर मारहाण करण्यात आली होती.
नेरुळ सेक्टर २३ येथील ड्रिम होरीझॉन सोसायटीमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. या इमारतीच्या तळाशी असलेल्या पार्किंगमध्ये पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चोरटा घुसला होता. ही बाब सुरक्षारक्षक व काही रहिवाशांच्या निदर्शनास आली असता, त्यांनी चोरट्याला पकडले; परंतु त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी इमारतीच्या तळघरातील एका खोलीत लोखंडी साखळीला बांधून डांबून ठेवण्यात आले. या वेळी तिथे जमलेल्या सोसायटीमधील रहिवाशांनी त्याला जबर मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर नेरुळ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला. त्याच्या हत्येप्रकरणी ड्रिम होरीझॉन सोसायटीमधील जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून, नेरुळ पोलीस अधिक तपास करत आहेत. युनुस (२५) असे मृत चोरट्याचे नाव असून, तो दारूच्या नशेत परिसरात चोरी करायचा, असे पोलीस चौकशीत उघडकीस आले आहे.

Web Title:  The death of the thieves killed the residents, the three arrested