शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नुकसान मुंबईतल्या कांदळवनाचे, झाडांची भरपाई मात्र गडचिरोलीत

By नारायण जाधव | Updated: December 2, 2023 08:13 IST

Mumbai News: मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या एमयूटीपी -३ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या बोरिवली-विरार दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई - मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या एमयूटीपी -३ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या बोरिवली-विरार दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मात्र, या प्रकल्पामुळे होणारे १२.७८०८ हेक्टर कांदळवनाचे नुकसान लक्षात घेऊन केंद्राने भरपाई म्हणून ९०० किलोमीटर दूरवर असलेल्या गडचिरोली येथे वृक्षारोपण करण्यास सांगितले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या हा ‘आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी’ निर्णय आता अडचणीत आला आहे.

बोरिवली ते विरार या पाचव्या आणि सहाव्या रेेल्वे लाइन्ससाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाचे सहायक वन महानिरीक्षक सी. बी. तहसीलदार यांनी १७ नोव्हेंबरला ही तत्त्वत: मान्यता दिली. असा ‘अविचारी’ आदेश जारी करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी ऑक्टोबरमध्ये, सिडकोकडून बांधण्यात येत असलेल्या कोस्टल रोडमध्ये बाधित होणाऱ्या कांदळवनाच्या भरपाईसाठी एमओईएफसीसीने जळगावच्या एका गावात परवानगी दिलेली आहे.

गडचिरोलीतील डीग्रेडेड वनक्षेत्रात वृक्षारोपण करण्यास आमची काहीच हरकत नाही, खरे पाहिले तर हे करणे गरजेचे आहे. परंतु, कांदळवन नष्ट करण्याच्या बदल्यात हे करण्याची गरज नाही, असे सांगून कांदळवन आणि जमिनीवरील झाडे निसर्गाच्या जैवविविधतेत निराळ्या भूमिका बजावत असून, त्यांच्याकडून त्यांच्या नैसर्गिक गुणांची अदलाबदल होणे असंभव आहे.- नंदकुमार पवार, प्रमुख, श्री एकवीरा आई प्रतिष्ठान

‘हा कांदळवन नष्ट करण्याचाच प्रकार’नवी मुंबईतील पर्यावरणवादी नाटकनेक्ट फाउंडेशनचे प्रमुख बी. एन. कुमार यांनी १२ हजारांहून अधिक खारफुटीचे डायव्हर्जन करणे म्हणजे कांदळवन नष्ट करण्यासारखेच असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने अशा प्रकारे त्याची भरपाई म्हणून ९०० किमी दूरवर वृक्षारोपणाद्वारे नुकसान भरून काढणे खूपच निरर्थक असल्याचे कुमार म्हणाले. अशा भरपाईमुळे गडचिरोलीच्या जंगलात मासे आणि खेकड्यांची पैदास होऊ शकते का आणि मुंबई किनारपट्टीवरील जैवविविधतेच्या नुकसानीची भरपाई गडचिरोलीत कशी काय होऊ शकते, असे प्रश्न कुमार यांनी केले आहेत.

बाळकूम-गायमुखचे वृक्षारोपण चंद्रपूर जिल्ह्यातमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नातील एक महत्त्वाचा मार्ग असलेल्या ठाण्यातील बाळकूम ते गायमुख या १३.२१५ किमीच्या सहापदरी सागरी रस्त्याच्या बांधकामात १२.२६०७ हेक्टर वनजमीन लागणार आहे. ती वळती करण्यास वने आणि पर्यावरण मंत्रालयाने २४ नोव्हेंबर २०२३ रोजी मंजुरी दिल्याने ठाणे महापालिकेसह एमएमआरडीएला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या वन जमिनीच्या नुकसान भरपाईच्या बदल्यातही चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यातील कुकूधेती गावातील १५ हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईforestजंगलGadchiroliगडचिरोली