सायबर सिटीला प्रदूषणाचा विळखा

By Admin | Updated: September 10, 2015 00:05 IST2015-09-10T00:05:03+5:302015-09-10T00:05:03+5:30

सुनियोजित शहर अशी ओळख असणाऱ्या नवी मुंबईभोवती प्रदूषणाचा विळखा घट्ट होत चालला आहे. हवेतील प्रदूषणामुळे शहरवासीयांना हृदय, फुप्फुसे व श्वसन यंत्रणेशी संबंधित आजार होण्याची

Cyber-city pollution detection | सायबर सिटीला प्रदूषणाचा विळखा

सायबर सिटीला प्रदूषणाचा विळखा

- नामदेव मोरे,  नवी मुंबई
सुनियोजित शहर अशी ओळख असणाऱ्या नवी मुंबईभोवती प्रदूषणाचा विळखा घट्ट होत चालला आहे. हवेतील प्रदूषणामुळे शहरवासीयांना हृदय, फुप्फुसे व श्वसन यंत्रणेशी संबंधित आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ध्वनिप्रदूषणही नियंत्रणाबाहेर गेले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मनपाने २०१४-१५ चा पर्यावरण स्थिती अहवाल बुधवारी सर्वसाधारण सभेत सादर के ला. शहरातील जीवनमान निर्देशांक वाढला असला तरी ध्वनी व हवा प्रदूषणामध्येही वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयआयटी कानपूर यांच्याशी सल्लामसलत करून हवा गुणवत्ता निर्देशांक मोजणी केली आहे. या अहवालाप्रमाणे शहरातील हवा पीएम १० प्रदूषणाकरिता हवा गुणवत्ता ७० टक्के म्हणजेच धोकादायक व फार वाईट वर्गवारीमध्ये आढळून आली आहे. बहुतांश मोजमापन करण्यात आलेल्या नोंदी मध्यम व फार वाईट वर्गवारीमध्ये आढळून आल्या आहेत. तुर्भे व कोपरखैरणे परिसरामध्ये धूलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हवेमुळे नागरिकांना हृदय, फुप्फुसे व श्वसनयंत्रणेशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढला आहे. दगडखाणी व इतर कारणामुळे हवा प्रदूषण वाढत आहे.

महापालिकेने
केलेल्या उपाययोजना
शहरातील १९ महत्त्वाच्या चौकांचे काँक्रीटीकरण, वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल व टायमर्स बसविले आहेत.
रबाळे, घणसोली, कोपरखैरणे व ऐरोलीमधील भुयारी मार्गाचे नूतनीकरण केले आहे.
रोडच्या दोन्ही बाजूंना हिरवळ तयार केली आहे.
पामबीचसह प्रमुख रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई.

शहरामधील ध्वनी व हवा प्रदूषणाची स्थिती
हवेमधील पीएम १० चे प्रमाण धोकादायक व फार वाईट वर्गवारीमध्ये आढळले.
तुर्भे व कोपरखैरणे परिसरामध्ये धूलिकणांचे प्रमाण सर्वात जास्त
निवासी परिसरामध्ये ध्वनिप्रदूषणाचे दिवसाचे प्रमाण ६९ डेसिबलपर्यंत गेले आहे.
निवासी परिसरात रात्रीचे ध्वनीचे प्रमाण ६०.२५ डेसिबलपर्यंत गेले आहे.
शहरातील रहदारीच्या सातही ठिकाणी ध्वनिप्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे.
सीबीडीमधील एक अपवाद वगळता सर्व शांतताक्षेत्रांमध्ये गोंगाट सुरु आहे.

Web Title: Cyber-city pollution detection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.