‘अॅस्ट्रोनॉट’ फराळाला ग्राहकांची पसंती

By Admin | Updated: October 16, 2014 23:19 IST2014-10-16T23:19:42+5:302014-10-16T23:19:42+5:30

धकाधकीच्या शहरी जीवनात घरात फराळ करून घरांच्याचे तोंड गोंड करण्यासाठी नोकरदार महिलांना वेळ नसतो.

Customer's choice for 'Astronaut' | ‘अॅस्ट्रोनॉट’ फराळाला ग्राहकांची पसंती

‘अॅस्ट्रोनॉट’ फराळाला ग्राहकांची पसंती

जान्हवी मोर्ये - ठाणो
धकाधकीच्या शहरी जीवनात घरात फराळ करून घरांच्याचे तोंड गोंड करण्यासाठी नोकरदार महिलांना वेळ नसतो. तसेच काहींच्या घरी हातभार लावायला कोणी नसल्याने शहरातील अनेक घरातून दिवाळीच्या तयार फराळाला अधिक पसंती दिली जाते. पण यंदा ‘फ्रिज्ड ड्राईंग’ तंत्रज्ञानाआधारे अॅस्ट्रोनॉटच्या माध्यमातून तयार केलेल्या फराळाची चव ग्राहकांना चाखता येत आहे. हे पदार्थ प्रथमच बाजारपेठेत आले असल्याने सध्या ग्राहकांना चवीसाठी त्यांचा मोफत नमुना देऊन त्यांची विक्री करण्यात येत आहे. हे पदार्थ त्यांच्या पसंतीस उतरत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. 
फ्रीज्ड ड्राइंग तंत्रज्ञान मराठी पदार्थाच्या बाबतीत पहिल्यांदाच वापरण्यात आले आहे. यामध्ये सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या डेझर्टर्पयतचा समावेश आहे. हे पदार्थ वजनाने हलके, विस्तवाशिवाय शिजणारे, फ्रीजशिवाय टिकणारे, तेलकटपणाचा मागमूसही नसलेले आणि तरीही खूप पोषणमूल्ये असलेले आहेत.   केवळ उकळते पाणी घालून ते पदार्थ तयार होतात. परदेशातील भारतीय खवय्यांना मायदेशातील पदार्थाची चव चाखता यावी आणि त्याचबरोबर मराठी पदार्थाना जागतिक पातळीवर नेणो हा त्यामागचा उद्देश आहे. 
डोंबिवलीतील विक्रेते सुनिल शेवडे यांनी सांगितले की, यंदाच्या वर्षी तयार फराळांचे बुकींग मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. काही जण तयार पीठ घेऊन जाऊन घरी पदार्थ तयार करतात. तर काही जण सण साजरा करण्यापेक्षा पिकनिकला जाणो पसंत करतात. आतार्पयत 1क्क् जणांनी दिवाळी फराळांचे बुकींग केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.  तर परदेशी फराळांचे बुकींग ही 5क् टक्क्यांनी कमी झालेले आहे. 
 दिवाळी महिन्याच्या  शेवटच्या आठवडय़ात आल्याने अनेकांचा बोनस झालेला नाही. सोमवारपासून बुकींग वाढेल, असे अपेक्षित आहे. चकली आणि शंकरपाळया यांच्या किंमतीत यंदाच्या दिवाळीत 1क् टक्के वाढ झाली आहे. 
श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले की, कच्च्या मालाच्या किंमती व वाहतूक खर्चात वाढ झाली असल्याने फराळांच्या किंमतीत वाढ झाली आहे. शिवाय निवडणुकीच्या काळात फराळ बनविण्यासाठी कामगार 
मिळत नाही. परदेशी फराळात कुरिअर खर्च वाढल्याने 15 
टक्के भाववाढ झाली आहे. युके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे फराळांवर 5 टक्के कर लावला जातो आहे. मागच्या वर्षी 1क्क् पार्सल पाठविण्यात आले होते. 
 
मधुमेही रूग्णांची दिवाळी फराळाविना?
मधुमेहाचा रूग्ण असलेल्यांना शुगरफ्री फराळ लागतो. एक किलो फराळाची किंमत 9क्क् ते 12क्क् रूपये आहे. यंदा हा फराळ ठेवलेला नाही. कारण कोणी जास्त घेत नाही. त्यासाठी लागणारी साखर ही 8क्क् रूपये किंमतीची आहे. ज्यांना पचनाचा त्रस आहे. त्यांचा डायटिंगचा फराळही विक्रीसाठी बाजारात नाही. त्याला प्रतिसाद कमी मिळतो. तो महाग असल्याने कुणी घेत नाही.

 

Web Title: Customer's choice for 'Astronaut'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.