आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत उत्सुकता

By Admin | Updated: August 30, 2016 03:04 IST2016-08-30T03:04:57+5:302016-08-30T03:04:57+5:30

‘लोकमत’ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र व दीपक फर्टिलायझर आणि पेट्रोकेमिकल कार्पोरेशन

Curiosity for the ideal teacher award | आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत उत्सुकता

आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत उत्सुकता

पनवेल : ‘लोकमत’ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र व दीपक फर्टिलायझर आणि पेट्रोकेमिकल कार्पोरेशन लिमिटेड पुरस्कृत ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०१६’ चे मानकरी कोण होणार, याची उत्सुकता शिक्षकांना लागली आहे. शाळांमध्ये शिक्षक चर्चा करताना दिसत आहेत.
पनवेल तालुक्यात प्रथमच उत्तम शैक्षणिक नेतृत्व, उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल सुमारे १०० शाळेतील शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देण्यात येत आहे. सरकार व जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी शिक्षकदिनाच्या औचित्याने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले जातात. यामध्ये तालुक्यातील केवळ एक किंवा दोन शिक्षकांना पुरस्कार प्राप्त होतो. यासाठी गट शिक्षण अधिकारी दोन किंवा तीन शिक्षकांचे प्रस्ताव मागून घेतात. ‘लोकमत’ने मात्र प्रत्येक शाळांना भेट देऊन शिक्षकांची माहिती गोळा केली आहे. त्यांच्या कर्तृत्त्वानुसार त्यांना पुरस्कृत करण्यात येणार असल्याने शिक्षकांमध्येही पुरस्काराबाबत उत्सुकता वाढत आहे.
शहरातील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बुधवार, ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title: Curiosity for the ideal teacher award