शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

बाजार समितीतील गर्दीमुळे धोका वाढला; सुरक्षा नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 11:38 PM

सुरक्षा नियमांचे उल्लंघन : मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाही, योजना कागदावरच

नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन जवळपास १ लाख नागरिकांची ये-जा सुरू झाली आहे. पाचही मार्केटमध्ये कोरोनाविषयी नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असून त्यामुळे नवी मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाजार समितीने कोरोना नियंत्रणासाठी उभारलेले वैद्यकीय तपासणी कक्ष बंद झाले आहेत. हात धुण्यासाठी बसविलेले नळ चोरीला गेले आहेत. प्रशासनाने व संचालक मंडळाने तत्काळ उपाययोजना करून नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारच्या वर पोहोचली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी  महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.

मुंबई बाजार समिती प्रशासनानेही मार्केट आवारात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. परंतु प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये या सर्व नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. मागील वर्षभरात बाजार समितीच्या पाचही मार्केटच्या प्रवेशद्वारावर वैद्यकीय कक्ष तयार केला होता. मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे तापमान व ऑक्सिजनची पातळी तपासली जात होती. सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जात होते.

हात धुण्यासाठी प्रवेशद्वारावर बेसीन बसविण्यात आले होते. परंतु सद्य:स्थितीमध्ये वैद्यकीय कक्ष बंद झाले असून इतर उपाययोजनाही कागदावरच राहिल्या आहेत.  भाजीपाला व फळ मार्केटमध्ये रोजंदारीवर काम करणारे कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. मार्केटमध्ये एक हजारपेक्षा जास्त कामगार मुक्काम करत असून ते नियमांचे पालन करत नाहीत. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई