काळंबादेवीच्या यात्रेत गर्दी

By Admin | Updated: April 22, 2016 01:59 IST2016-04-22T01:59:57+5:302016-04-22T01:59:57+5:30

पेण तालुक्यातील गडब येथील काळंबादेवीच्या यात्रेत हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले तर यात्रेतील प्रमुख आकर्षण असणाऱ्या देवकाठ्या स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती

The crowd in the journey of Kalambadevi | काळंबादेवीच्या यात्रेत गर्दी

काळंबादेवीच्या यात्रेत गर्दी

पेण (वडखळ) : पेण तालुक्यातील गडब येथील काळंबादेवीच्या यात्रेत हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले तर यात्रेतील प्रमुख आकर्षण असणाऱ्या देवकाठ्या स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
सकाळी पारंपरिक पध्दतीने मंत्रपुष्पांजली होवून देवीला अभ्यंग स्नान घालून विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर चांदीचा सुशोभित मुकुट, रंगीबेरंगी कपडे, सोन्याच्या अलंकारांनी देवी शृंगारली गेली तर यात्रेत विविध खेळण्यांची दुकाने, मिठाईची दुकाने, शोभेच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी आदि वस्तूंची दुकाने मांडण्यात आली होती. खेळण्याच्या दुकानात लहान मुलांनी गर्दी केली होती व खेळणी खरेदी करण्याचा आनंद लुटत होती तर इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात महिलांची गर्दी पहावयास मिळाली. तरु णवर्ग डीजे व ढोलाच्या तालावर नृत्य करण्यात मग्न होते. तर दुपारी गडब गावातून काळंबादेवीची पालखी वाजतगाजत मंदिरांत आणण्यात आली नंतर परिसरातील गावांतून आणण्यात आली.परिसरातील गावातून वाजतगाजत ग्रामस्थांनी आणलेल्या उंच देवकाठ्या उभारण्यात आल्या. या वेळी देवकाठ्या स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.आधुनिक युगातही गावाकडच्या यात्रांमध्ये तरु णांचा उत्साह जाणवत होता. अगदी व्यवसाय व शिक्षणानिमित्त बाहेर गेलेल्या
तरु णांनी यात्रेत हजेरी लावली होती. तर नवसाला पावणारी काळंबादेवी अशी देवीची ख्याती आहे. (वार्ताहर)

Web Title: The crowd in the journey of Kalambadevi