शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

नवी मुंबईत गुन्ह्यांचा आलेख निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 00:15 IST

लॉकडाऊनचा काळ ठरला फायदेशीर : पाच महिन्यांत ७४३ गुन्ह्यांची नोंद; चोरीच्या गुन्ह्यांत घट

सूर्यकांत वाघमारे।

नवी मुंबई : कोरोनामुळे लागलेला लॉकडाऊन शहरातील गुन्हेगारीत घट होण्यास प्रभावशाली ठरला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचा चोख बंदोबस्त व नागरिक घरातच बंदिस्त राहिल्याने गुन्हेगारांना संधी मिळालेली नाही. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत पाच महिन्यांत गुन्ह्यांची संख्या निम्म्यावर आली आहे.

शहरात वाहनचोरी, सोनसाखळी चोरी तसेच घरफोडी हे गुन्हे नेहमीचेच झाले आहेत. दाट लोकवस्ती व आडोशाच्या जागा असलेल्या ठिकाणी चोरट्यांना लपायची संधी मिळत असल्याने अशा ठिकाणी सर्वाधिक चोऱ्या घडत आहेत. त्यावर पोलिसांकडून अनेक उपाययोजना राबवूनही गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आव्हान निर्माण झाले होते. अखेर कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील गुन्हेगारी बºयाच प्रमाणात नियंत्रणात आली आहे. त्यात चोरी, घरफोडी अशा मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांसह इतरही गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.गतवर्षी मेअखेरपर्यंत परिमंडळ एकमध्ये १०९० गुन्हे घडले होते. त्यामध्ये मालमत्तेशी संबंधित ५२३ गुन्ह्यांचा समावेश होता. तर महिला अत्याचार व छळवणुकीचे १३९ गुन्हे घडले होते. परंतु चालू वर्षात मेअखेरपर्यंत ७४३ गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये मालमत्तेविषयीचे ३४४ तर महिलांविषयीचे ९९ गुन्हे आहेत. यापैकी बहुतांश गुन्हे जानेवारी ते मार्च महिन्याच्या कालावधीतलेच आहेत. त्यानंतर अद्यापपर्यंत शहरात लॉकडाऊनमुळे पोलिसांची गस्त व आवश्यक ठिकाणी बंदोबस्त असल्याने गुन्ह्यांना आळा बसला आहे.मध्यंतरीच्या काळात लॉकडाऊन असतानादेखील रात्रीच्या वेळी काही ठिकाणी चोरट्यांकडून गुन्ह्याच्या उद्देशाने टेहळणी सुरू असल्याचेही प्रकार समोर आले होते. परंतु तुरळक घटना वगळता चोरी अथवा घरफोडीच्या अधिक घटना घडल्या नाहीत.चालू वर्षात मेअखेर पर्यंत एकूण ७४३ गुन्हे घडले आहेत. गतवर्षी याच पाच महिन्यात १,०९० गुन्हे घडले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लॉकडाऊन दरम्यानचा बंदोबस्त व इतर कारणांनी गुन्ह्यात घट झाली आहे.- पंकज डहाणे,उपायुक्त - परिमंडळ १ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी