शिवीगाळ करणाऱ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

By Admin | Updated: April 19, 2016 02:20 IST2016-04-19T02:20:54+5:302016-04-19T02:20:54+5:30

कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील साईमंदिर नाक्यावर लावलेल्या फलकाची मोडतोड केल्याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The crime of atrocity on abusers | शिवीगाळ करणाऱ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

शिवीगाळ करणाऱ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

नेरळ : कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील साईमंदिर नाक्यावर लावलेल्या फलकाची मोडतोड केल्याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या बॅनरची मोडतोड केल्याबद्दल रवींद्र जाधव यांना कोल्हारे गावातील संजय खाडे याने जातीवाचक शिवीगाळ केली होती.
कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीमधील बोपेले गावातील बौद्ध समाजाचे तरु ण रवींद्र जाधव यांना साईमंदिर नाक्यावर लावलेल्या बॅनरची मोडतोड कोणी करीत असल्याचे दिसून आले. जाधव यांना फाडण्यात येत असलेला बॅनर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देणारा असल्याचे दिसून आले. त्यावेळी रवींद्र जाधव यांनी तत्काळ बॅनरची मोडतोड करीत असलेल्या तरु ण संजय खाडे यास हटकले. तेव्हा संतापलेल्या संजय खाडे याने बौद्ध समाजाचे तरु ण रवींद्र जाधव यांना जातीवाचक शिवीगाळ सुरू केली. साईमंदिर नाक्यावर प्रचंड जमाव जमला होता. शेवटी पोलीस आल्याने तणाव शांत झाला. त्यानंतर बोपेले येथील रवींद्र जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी संजय वामन खाडे याच्याविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपाधीक्षक शालिग्राम पाटील यांनी चौकशीअंती कोल्हारे गावातील संजय खाडे याच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला.

Web Title: The crime of atrocity on abusers