वीज कार्यालय तोडफोडप्रकरणी सहा जणांवर गुन्हे

By Admin | Updated: June 2, 2017 05:46 IST2017-06-02T05:46:56+5:302017-06-02T05:46:56+5:30

मुरु ड तालुक्यातील वीज ही २४ तासांपेक्षा जास्त तास गेल्याने संतप्त जमावाने मुरु ड शहरात असणाऱ्या वीज मंडळ कार्यालयाची

Crime against six office-bearers | वीज कार्यालय तोडफोडप्रकरणी सहा जणांवर गुन्हे

वीज कार्यालय तोडफोडप्रकरणी सहा जणांवर गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव /मुरु ड : मुरु ड तालुक्यातील वीज ही २४ तासांपेक्षा जास्त तास गेल्याने संतप्त जमावाने मुरु ड शहरात असणाऱ्या वीज मंडळ कार्यालयाची मंगळवारी रात्री तोडफोड केली होती. त्याचबरोबर तिथे उभ्या असणाऱ्या चारचाकी गाडीच्याही सर्व काचा फोडून त्याचे नुकसान करण्यात आले होते. या नुकसानीमुळे जिल्हा पोलीस उपाधीक्षक डी.बी. निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश भोसले यांनी जमावातील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात मुरु ड पोलीस ठाण्याकडून सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच काही चित्रीकरण पाहून व सत्यता पडताळून गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती उपाधीक्षक डी.बी. निघोट यांनी दिली.
सफवान बापू फराश, नियाज नासिर अन्सारी, शोएब सन्नवर सय्यद, मोहताज जमीर जहांगीर, उमेश गजानन भोईर व कुणाल सतवडीकर अशा सहा जणांवर, तसेच पब्लिक प्रॉपर्टी अ‍ॅक्टअन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या सर्वांवर बेकायदा गर्दी करणे, दगडफेक करणे, सरकारी लोकांवर हल्ला करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे अशा स्वरूपाची कलमे लावण्यात आलेली आहेत.
ज्या वीजमंडळातील लोकांनी वीज गायब करून कार्यालयात कोणतीही व्यक्ती चौकशीसाठी न ठेवता लोकांना वेठीस धरले त्या लोकांवरसुद्धा गुन्हे दाखल व्हावेत, अशी अपेक्षा मुरुडमधील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत उपअधीक्षक डी.बी. निघोट यांच्याकडे विचारणा केली असता ज्या दिवशी वीज गायब होती त्यावेळी वीज मंडळातील सर्व कर्मचारी ज्या ठिकाणी बिघाड झाला होता तिथे ते दुरुस्ती करत होते. ते आपले कर्तव्यच बजावत होते, त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. वीज गायब झाल्यावर लोकांनी वीज कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी करून वीज मंडळ कार्यालयातील सर्व वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानेच आम्हाला सदरची कार्यवाही करणे भाग पडल्याचे या वेळी त्यांनी स्पष्ट केले. संशयित ४० लोकांची यादी असून योग्य पडताळणी करूनच गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

Web Title: Crime against six office-bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.